Published On : Mon, Jul 27th, 2020

खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील कनिष्ठ अभियंता पॉझिटिव्ह

Advertisement

प्रकाशनगर वसाहतीत क्वारटाईन असतांना मुक्काम पोस्ट नांदेड,वीज केंद्र प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह,वीज केंद्र कामगार वर्तुळात खळबळ

खापरखेडा-/नागपुर: नांदेड जिल्ह्यातून वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत आलेल्या एका कनिष्ठ अभियंत्याला होम क्वारटाईन करण्यात आले त्यामुळे त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली २४ जुलै सायंकाळला त्याची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली मात्र त्याचा शोध सुरू केला असता मुक्काम पोस्ट नांदेड जिल्हा आढळून आले त्यामुळे क्वारटाईन वीज केंद्राच्या वसाहतीत असतांना मुक्काम पोस्ट नांदेड जिल्हा कसा? असा प्रश्न निर्माण झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

५०० मेगावॅट खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील चाचणी उपकरण विभागात एक ३५ वर्षीय कनिष्ठ अभियंता कार्यरत असून प्रकाशनगर वसाहतीतील गाळा क्रमांक ४८ मध्ये वास्तव्यास आहे काही दिवसांपूर्वी त्याचे लग्न झाले आहे सदर अभियंता एकटा दुचाकीने १७ जुलै रोजी नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या कुंडलवाडी गावावरून प्रकाशनगर वसाहतीत परतला त्यामुळे त्याला स्थानिक वीज केंद्र प्रशासनाने नियमाप्रमाणे १४ दिवस होम क्वारटाईन केले यादरम्यान त्यांची २३ जुलै गुरुवारला सावनेर येथे स्वॅब टेस्ट घेण्यात आली २४ जुलै सायंकाळला त्याच्या स्वॅब टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला त्यामुळे प्रकाश नगर वसाहतीत कनिष्ठ अभियंत्याचा शोध सुरू झाला मात्र होम क्वारटाईन असलेला कनिष्ठ अभियंत्याने २४ जुलै शुक्रवारला मुख्यालय सोडून दुचाकीने नांदेड गृह जिल्हा गाठला याची साधी माहिती स्थानिक वीज केंद्र प्रशासनाला नसल्यामुळे सर्वत्र धावपळ उडाली.

प्रकाशनगर वसाहतीची सुरक्षा भेदून कनिष्ठ अभियंता नांदेड जिल्ह्यात शिरला कसा?
५०० मेगावॅट खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत ३५ वर्षीय कनिष्ठ अभियंता नांदेड जिल्ह्यातून १७ जुलैला वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत दाखल झाला त्यामुळे त्याला त्याच्या गाळ्यातच होम क्वारटाईन करण्यात आले प्रकाशनगर वसाहतीत मुख्य अभियंत्याचा बंगला व वसाहत असल्यामुळे मोठया प्रमाणात सुरक्षा आहे होम क्वारटाईन करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्यांचा गाळा मुख्य अभियंत्यांच्या बंगल्या शेजारी असल्यामुळे क्वारटाईन गाळ्याला सुरक्षा आहे मात्र असे असतांना सुरक्षा भेदून सदर कनिष्ठ अभियंता आपल्या गृह जिल्ह्यात नांदेडला दाखल झाला कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वीज केंद्र प्रशासनाकडून खुलासा मागविणार-तहसीलदार दिपक करांडे*
स्थानिक ५०० मेगावॅट औष्णिक वीज केंद्रात कार्यरत कनिष्ठ अभियंता २४ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला यासंदर्भातील माहिती स्थानिक वीज केंद्र प्रशासन व आरोग्य विभागाला देण्यात आली मात्र सदर अभियंता होम क्वारटाईन असतांना आपल्या गृह जिल्ह्यात नांदेडला दुचाकीने गेल्याचे समजले सदर बाब गंभीर आहे होम क्वारटाईन असतांना जिल्हा बंदी आदेश तोडून ईतर जिल्ह्यात दाखल होने कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे सर्वस्वी जबाबदारी स्थानिक वीज केंद्र प्रशासनाची आहे काही दिवसांपूर्वी प्रत्येक्ष वीज केंद्र परिसराला भेट देऊन सावनेरचे तहसीलदार दिपक करांडे यांनी पाहणी केली होती यावेळी त्यांनी मुख्य अभियंत्यांना आवश्यक सूचना होत्या मात्र सदर सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले नाही त्यामुळे पत्र देऊन लवकरच खुलासा मागण्यात येणार असून आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार दिपक करांडे यांनी सांगितले.

पॉझिटिव्ह रुग्णांशी झाला वीज केंद्र प्रशासनाचा संपर्क
नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या कुंडलवाडी गावावरून १७ जुलैला परतलेल्या कनिष्ठ अभियंत्याला १४ दिवस क्वारटाईन करण्यात आले २४ जुलैला सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला त्यामुळे त्याचा शोध घेतला मात्र ते दुचाकीने नांदेडला गेल्याची माहिती मिळाली पॉझिटिव्ह कनिष्ठ अभियंत्याशी संपर्क झाला त्यांना नजीकच्या क्वारटाईन सेंटरमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जनसंपर्क माहिती अधिकारी राऊत यांनी सांगितले यासंदर्भात तहसीलदार, तालुका आरोग्य कार्यालय, स्थानिक पोलीस स्टेशन, चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्र यांना यासंदर्भात माहिती दिल्याचे सांगितले.

चौकाशी समिती गठीत करून कठोर कार्यवाही करा
स्थानिक वीज केंद्रात चार कंत्राटी व एका कंत्राटी कामगाराची पत्नी पॉझिटिव्ह आढळून आली त्यामुळे तहसीलदार व स्थानिक जनप्रतिनिधींनी वीज केंद्राची पाहणी केली यावेळी अनेक त्रुटी आढळून आल्या आवश्यक सूचना देण्यात आल्यात मात्र कोणतीही अमलबजावणी करण्यात आली नाही २१ जुलै रोजी पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करणार असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले मात्र यापूर्वी जिल्हा बंदी आदेश तोडणाऱ्या अभियंत्यावर कार्यवाही शून्य आहे वीज केंद्रात अनेक उपाय योजना करण्यात येतात मात्र त्या नावालाच असतात त्यामुळे
यासंदर्भात उच्च स्तरीय चौकाशी करून दोषींवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम १८८ नुसार कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

दुचाकीने प्रवास करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांची ट्रायव्हल हिस्ट्री चेक करने आवश्यक
स्थानिक वीज केंद्रात कार्यरत कनिष्ठ अभियंता १७ जुलै रोजी दुचाकीने नांदेड वरून वीज केंद्राच्या प्रकाश नगर वसाहतीत आला २३ जुलै रोजी त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली २४ जुलै सायंकाळी स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली मात्र त्यापूर्वी दुचाकीने नांदेड ला आपल्या गृह जिल्ह्यात दाखल झाला यादरम्यान तो कोणाच्या संपर्कात आला याची तपासणी करने आवश्यक आहे.