Published On : Wed, Aug 28th, 2019

जिजाऊ शोध संस्थान प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी

Advertisement

प्रज्वला योजनेंतर्गत महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग १५ मधील शंकर नगर येथील जिजामाता सभागृहाजवळ शुक्रवारी (ता.३०) ‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच राज्य महिला आयोगाच्या प्रज्वला योजने अंतर्गत बचत गटातील महिलांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन प्रकल्प हे मनपाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून महिलांच्या उत्थानासाठी यामार्फत कार्य केले जाणार आहे. यावेळी राज्य महिला आयोगाच्या प्रज्वला योजने अंतर्गत शहरातील बचत गटाच्या महिलांना महिलांविषयक कायद्याची माहिती, महिला विषयक शासनाच्या विविध योजना आदींची माहिती देण्याच्या दृष्टीने एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी (ता.३०) शंकरनगर मनपा शाळा बास्केटबॉल कोर्टच्या बाजूला असलेल्या जिजामाता सभागृहाजवळ सकाळी ११ वाजता केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महिला सक्षमीकरणा अंतर्गत ‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन प्रकल्पाचे भूमिपूजन होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वित्त आणि नियोजन, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्य उत्पादन शुल्क तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम वन, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील.

कार्यक्रमाला खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, बसपाच्या पक्षनेत्या वैशाली नारनवरे, राकाँचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्ष नेते किशोर कुमेरिरया, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेविका रूपा राय, नगरसेवक संजय बंगाले, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांची विशेष उपस्थिती राहील.

कार्यक्रमाला शहरातील विविध बचत गटाच्या महिलांनी उपस्थित राहून कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement