Published On : Sun, Sep 15th, 2019

पालकमंत्र्यांच्या हस्ते मौदा तालुक्यातील कोट्यवधींच्या विकास कामांचे भूमिपूजन

नागपूर: कामठी विधानसभेतील मौदा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींमध्ये गावाच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून कोट्यवधीच्या विकास कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रामुख्याने माजी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर व टेकचंद सावरकर उपस्थित होते.

चिरव्हा येथे सभामंडप, चिचोली, मारोडी येथे आंगणवाडी बांधकाम, मोहाडी महादुला रस्ता भूमिपूजन, निहारवाणी भोवरी रस्ता, सिंगोरी मोहाडी रस्ता, महादुला अप्रोच रस्ता, कोराड मोहाडी रस्ता, चिरव्हा येथे राधाकृष्ण मंदिर परिसराचे सिमेंटीकर, मारोडीजवळ श्री क्षेत्र झिरी येथे भक्तनिवास बांधकाम, निहारवाणी येथे पाणीटाकी आदींचा त्यात समावेश आहे.

खनिज निधीतून मौदा तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात नाला खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी 17 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

कोदामेंढी अरोली जि.प. सर्कलमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून श्रीखंडा, कोदामेंढी, नांदगाव येथे अंगणवाडी बांधकाम प्रत्येकी 8.50 लाख रुपये. सिरसोली येथे पूरसंरक्षण भिंत 46.16 लाख, सुकळी येथे यात्री निवास बांधकाम 25 लाख, कोदामेंढी येथे यात्रीनिवास बांधकाम 20 लक्ष रुपये, वाकेश्वर येथे सिमेंट रस्ता बांधकाम 46.25 लक्ष रुपये, इंदोरा इंद्रपुरी रस्ता बांधकाम 49.74 लक्ष, नांदगाव चोरवाळा रस्ता 59.74 लक्ष, वाकेश्वर येथे शाळा खोल्यांचे बाधकाम 49.70 लक्ष, सुकळी व कोदामेंढी शाळा खोल्या बांधकाम प्रत्येकी 9.50 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कुंभापूर-किरणूर येथे अंगणवाडी बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येकी 8.50 लक्ष रुपये उपलब्ध झाले. नरसाळा मांगली चांदे रस्ता 15 लक्ष जि.प. बांधकाम विभाग, पावडदौना मोहाडी चिरव्हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 7.31 कोटी रुपये, नरसाळा ते मांगली चांद रस्ता 1.90 कोटी, सिंगोरी रस्ता 2.31 कोटी, बाबदेव येथे नाल्यावर उपसा सिंचन योजना 43.3 कोटी, कन्हान नदीवर उपसा सिंचन योजना 131 कोटी, माथनी येथे सभागृह बांधकाम 15 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

या संपूर्ण दौर्‍यात पालकमंत्री बावनकुळे यांच्यासोबत चांगोजी तिजारे, राजू सोमनाथे, भारती सोमनाथे, सदानंद निमकर, मुन्ना चलसानी, योगेश वाडीभस्मे, नरेश मोटघरे, हेमराज सावरकर, हरीश जैन, ईश्वर भागलकर, बेनीराम तिघरे आदी उपस्थित होते.