Published On : Thu, Aug 29th, 2019

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मनपातर्फे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

Advertisement

नागपूर : हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती संपूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरे करण्यात येते. गुरूवारी (ता.२९) नागपूर महानगरपालिकेमध्येही क्रीडा दिन साजरा करण्यात आला. मनपा क्रीडा विशेष समिती सभापतींच्या कक्षामध्ये हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला महापौर नंदा जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी क्रीडा विशेष समिती सभापती प्रमोद चिखले, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, क्रीडा समिती उपसभापती मनिषा कोठे, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, धंतोली झोन सभापती लता काडगाये, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका रूपा रॉय, नगरसेविका स्नेहल बिहारे, नगरसेवक नागेश मानकर, नगरसेवक संजय बुर्रेवार, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, जितेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मेजर ध्यानचंद यांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर सलग तीनदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावून जगाला चकीत केले. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणारी ही घटना आहे. हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मेजर ध्यानचंद यांच्यामुळे देशाला मिळाला. आज नागपूर शहरामध्ये क्रीडा वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडूंसाठी नवे दालन खुले केले आहे. त्यांच्याच पुढाकाराने शहरातील क्रीडा मैदानांचा विकास करुन शहरातील खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. आपल्या नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. याशिवाय मनपाच्या शाळांचे विद्यार्थीही विविध स्पर्धांमध्ये ठसा उमटवित आहेत. शहरातून पुढेही प्रतिभावंत खेळाडू पुढे यावेत यासाठी क्रीडा समितीतर्फे कार्य सुरूच राहावेत, अशी अपेक्षाही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा विशेष समिती सभापती प्रमोद चिखले यांनी केले.