कन्हान : – भाविक मंच दत्त मंदिर व्दारे दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण करून “झाडे लावा , झाडे जगवा ” चा संदेश देण्यात आला . मंगळवार (दि.९) ला दंत मंदीर कांद्री परिसरात मान्यवरांच्या हस्ते १०० झाडांचे वृक्षारोपण करून “झाडे लावा झाडे जगवा” चा संदेश देत हिरवे निसर्ग सुंदर पर्यावरण ठेवण्याची शपत घेण्यात आली.
याप्रसंगी प्रामुख्याने कांद्रीचे सरपंच मा बलवंत पडोले, योगेश वाडीभस्मे, अशोक हिंगनकर, शिवाजी चकोले, नरेश पोटभरे, नथुजी वझे, लींतेश वाडीभस्मे, देवचंद्रजी कुंभालकर, बंडु बावनकुळे, गणेशजी भक्ते, राजेश भक्ते, रोशन किरपान, नितेश कामळे, सुनील ढोबळे, संदीप भोयर, राहुल मस्के, जितेंद्र आकरे आदीने सह ग्रामस्थ उपस्थित राहुन वृक्षारोपण केले.