Published On : Wed, Jul 10th, 2019

राष्ट्रहित ऑटो युनियनचे एक दिवसीय ऑटोरिक्षा बंद यशस्वी

Advertisement

कन्हान : – राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हान सर्कलच्या विद्यमाने एक दिवसीय ऑटो रिक्षाबंदचे आयोजन डाॅ.अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात विविध मागण्याकरीता करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन कन्हान नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी भरत नंदनवार यांना देण्यात आले. राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हान सर्कल कडुन महाराष्ट्र राज्य चालक मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीला समर्थन जाहीर करण्यात आले.

वाढलेला इंशोरेन्स कमी करावा. *अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी.*ऑटो चालक कल्याणकारी महामंडळाच्या शिफारशी लागू कराव्या. * ऑटो चालकांना लोक सेवकाचा दर्जा देण्यात यावा.*जिल्हास्तरीय आ. टी.ए. कमेटीवर ऑटोरिक्षा चालकाच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात यावी आणि इतर प्रलंबित असलेल्या मागण्या चे निवेदन मुख्याधिकारी भरत नंदनवार याच्या माध्यमाने शासनाला देण्यात आले.

सर्व ऑटो चालक मालक यानी वैयक्तिक मतभेद बाजुला सारून एकत्र यावे. आपल्या रास्त मागण्या काॅग्रेस पक्ष व मी स्वतः शासन दरबारी मांडणार यासाठी आपल्या सोबत रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करून न्याय मिळवून देणार असे सभेला संबोधताना डाॅ.अमोल देशमुख म्हणाले.

यावेळी राष्ट्रहित ऑटो युनियन नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र वाघमारे, बाळु नामदेव, कैलास खोब्रागडे, नरेंद्र पात्रे, गजु बल्लारे, विनोद रंगारी, सुरेश शेन्दे, लियाकत खान, नंदु देशभ्रतार, शेखर पेटारे, धरम पात्रे, गगन पात्रे, सुवर्णा गायकवाड, अरम जोसफ, सुखराम वाघमारे, नागेंद्र राॅय, अरूण बावणकुळे, गुडडु यादव, नितीन लिखीतकर, मुकुंद उम्रटकर, केशव सिंग, राजु डडुरे, प्रकाश भोवते, रामक्रिष्णा हुड, मुकेश खडसे यांच्या सह सर्व युनियनचे सदस्य आणी काॅग्रेस पदाधीकारी कार्यकर्ता मोठय़ा संख्येने उपस्थित होते.