Published On : Thu, Aug 20th, 2020

“भारत रत्न” राजीव गांधी जयंती प्रित्यर्थ म.न.पा. केंद्रीय कार्यालयात सद् भावना दिन साजरा

भारताचे माजी पंतप्रधान भारत रत्न स्व. राजीव गांधी यांच्या ७६ व्या जयंती प्रित्यर्थ म.न.पा.च्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी ‍समिती सभागृहात नगरीचे महापौर श्री. संदीप जोशी व उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे यांनी भारत रत्न राजीव गांधी यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तदनंतर महापौरांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद् भावना दिनाची सामूहिक प्रतिज्ञा दिली.

भारताला एक प्रगत राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी दूरसंचार तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे मोठे योगदान असल्याची भावना महापौरांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष श्री.विजय (पिंटू) झलके, सत्ता पक्षनेता श्री. संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, आमदार तथा माजी महापौर श्री. प्रवीण दटके, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रदीप पोहाणे, माजी उपमहापौर श्री. सुनिल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री.निर्भय जैन, श्री. सुभाष जयदेव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.