Published On : Mon, May 28th, 2018

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक, मतदान सुरू; 11 ईव्हीएम पडले बंद

voting

भंडारा-गोंदिया : भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी मतदान सुरू झाले. तुमसर तालुक्यातील खरबी, हिंगणा, मांढळ आणि खापा मध्ये 11 ईव्हीएम मशिन्स बंद पडले होते.
निकाल गुरुवारी 31 मे रोजी जाहीर होईल.

या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स सुरत आणि बडोदा येथून आणली आहेत.

Advertisement

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार असून नक्षलग्रस्त मोरगाव अर्जुनी तालुक्यात मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच असेल.

एकूण दोन हजार 126 मतदान केंद्र असून 17 लाख 48 हजार 677 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

उमेदवार

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपाकडून हेमंत पटले मैदानात आहेत.

भाजपाचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार होते. एकूण 18 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजपा आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement