Published On : Tue, Jul 2nd, 2019

गंगा नदी, तीरावर भागवत कथा संपन्न

नागपूर :- सविता गायत्री बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने गंगा नदी तीरावर नुकताच भागवत सप्ताह पार पडला. या सप्ताहात नागपूरच्या भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. भागवत सप्ताह करिता नागपुरातून भाविक भक्तांचा 17 जून रोजी, गंगानदी कडे रवाना झाला होते. या कथेचे अध्यक्षपद सौ. सविताताई पाटणे, मध्य नागपूरच्या प्रभारी यांना देण्यात आले होते.

यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम पार पडला .कलशयात्रा, कृष्ण जन्माष्टमी, रुक्मिणी विवाहाची वरात मोठ्या थाटात काढण्यात आली. कथावाचक रामाणून महाराजांच्या मधुर सर्व भाविक भक्तिरसात रसात मग्न झाले होते. राधा कृष्णाच्या भक्ती रसात मग्न होऊन भाविक बेधुंद नाचले. तिथे गेल्यानंतर भारत देशाची मूळ संस्कृती लक्षात येते.

सर्व ऋषी-मुनी मोठ्या प्रमाणात तपस्या करतात आणि तिथेच मुलांना वेदशास्त्राचे शिक्षण देण्यात येते.