Published On : Tue, Jul 2nd, 2019

एम एम आर डी ऐ विरोधात लोकांचा जनाक्रोश

Advertisement

गरिबांना बेघर केल्यामुळे संतप्त जनता उतरली रस्त्यावर

कामठी:- एम एम आर डी ऐ चे हनुमाननगर झोन आधिकारी अवस्थी आणि नागपूर महानगर पालिका अधिकारी ठाकरे यांच्या नेतृत्वात महाकाळकर लेआऊट येथिल रहिवास्यांची घरे पाडण्याचा तुगलकी निर्णय घेण्यात आला.सहा घरे पाडण्यात आली आणि निर्सगामुळे पाऊस आला व इतर घरे वाचली. एकिकडे हजारो झोपडपत्टिवासीयांना पट्टे वाटप करणार , अतिक्रमण नियमित करणार असल्याचे व गरिबांना घरे देण्याचे आश्वासन देत सरकार सत्तेवर आली आणि दुसरिकडे पै-पै पैसा जोडुन प्लॉट घेवुन घरे बांधुन राहणा-या गरिबांना बेघर करण्याचे काम केल्या जात आहे. तिन वर्षापासुन याविरोधात लढाई सुरु आहे. यापुर्विही प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात या गरिबांची घरे वाचविण्यासाठी मोठमोठी आंदोलने झाली. निवेदनं देण्यात आली केंद्रियमंत्री गडकरी साहेब आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी गरिबांवर अन्याय होणार नाही. पुणर्वसन करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अनेकांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहे. काहिंना नागपूर महानगर पालिका विरोधात स्थगनादेश तर काहिंना जैसे थे चे आदेश मिळाले. ही जागा नागपुर सुधार प्रन्यास च्या मालकीची असुन ती नागपुर महानगर पालीकेला हस्तांतरित करण्यात आली. व ना.सु.प्र तर्फे सिंबासिस व क्रिडासंकुल साठी राखिव करण्यात आली. असे उत्तर अधिका-यांकडुन ऐकायला मिळते. मग मागिल पन्नास वर्षापासुन ती जागा शेतक-याच्याच नावावर कशी? या जागांची अनेकदा खरेदि विक्री कशी झाली? दुय्यम निबंधकाकडुन तिची नोंदणी कशी झाली? प्लॉट पाडुन विकल्या गेले तेव्हा नासुप्र व मनपा अधिकारी काय करत होते? ही जागा अकृषक कशी झाली? आणि आता या सर्व भ्रष्ट शासन प्रशासन व्यवस्थेमुळे जन्मभ-याची कमाई खर्चुन ज्या छत उभे केले अशा गरिबांना पुन्हा बेघर करण्याचा डाव या भ्रष्न शासन प्रशासनाने रचला. यांचा कारस्थानी डाव म्हणजे आजपर्यंत नोटिस मनपाच्या माध्यमातुन देण्यात आले.

मनपाविरोधातच न्यायालयिन लढाई सुरु आहे आणि आता मात्र एम एम आर डि ए च्या माध्यमातुन ऐक दिवस आधी नोटिस दिला. नोटिसचे उत्तर द्यायला वेळही दिला नाही आणि दुस-याच दिवशी कारवाई केली. आजही रविवार असतांनाही कारवाई करण्यासठी एम एम आर डी ऐ अधिकारी अवस्थी यांच्यसह टिम उपस्थित होती परंतु जनतेचा आक्रोश पाहुन टिम कारवाई न करताच परत गेली. संतप्त जनता रस्त्यावर उतरली नारेबाजी करत वाठोडा चौकात आली रस्तारोको केला.

जवळपास एक तास महिला व पुरुषांनी रांगा करुन आडवे होवुन वाठोडा चौक रोकुन धरला. ट्रक व गाड्यांचा मोठ्या रांगाच्या रांगा अडलेल्या होत्या. भाजपा सरकार नासुप्र, मनपा व एम एम अार डी ऐ विरोधात नारेबाजी होत होती. संतप्त महिलांना पोलिस निरिक्षक नंदनवन चव्हान साहेब यांना प्रश्न विचारला की काल आमची घरे टुटली तेव्हा तुम्ही का आले नाहित? तसेच पुरुषांनी आपले शर्ट काढुन उघड्या अंगाने निषेध व्यक्त केला. प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता व महिला कॉग्रेसच्या तालुकाअध्यक्ष प्रा अवंतिका लेकुरवाळे व तडफदार युवा आशिष मल्लेवार खंबीरपणे नेहमिप्रमाणेच मदतिला धावुन आले. सर्वांना धिर दिला जमावाचे नेतृत्व करित त्यांना शांत केले.

याप्रसंगी अश्वजीत रामटेके हा तरुन माझे घर वाचनार नसेल तर मी जगुन काय करु म्हणुन ट्रक समोर आडवा झाला परंतु अवंतिका लेकुरवाळे ग्रा. प. सदस्य आशीफ भाई आणि पोलिसांनी त्याला समजावले व शांत केले हरिंचंद्र पागोटे, इरफान शेख अजय पचघरे, चक्रधर बाबरे, प्रशांत नागभिडकर इत्यादी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement