Published On : Fri, Jun 21st, 2019

बेटिक- आयआयटी-मुंबई यांच्यातर्फे ‘मेधा’ २०१९’ (MEDHA-मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉन) या स्पर्धेचे आयोजन

Advertisement

नागपूरमध्ये 27-28 जुलै रोजी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयात स्पर्धचे आयोजन
स्थानिक पातळीवर उपाययोजना विकसित करण्यासाठी डॉक्टर आणि अभियंते ‘ मेधा (MEDHA) २०१९ ‘च्या निमित्ताने एका व्यासपीठावर

वैद्यकीय गरजा भागविणाऱ्या कल्पक उपकरणांच्या नवनिर्मितीसाठी प्रेरणा देण्यासाठी आयआयटी मुंबईतील, बायोमेडिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी इनक्युबेशन सेंटर (‘बेटिक’), सीओई पुणे आणि व्हीएनआयटी नागपूर यांच्यातर्फे मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉन अर्थात मेधा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने डॉक्टर आणि इंजिनीअर्स एका व्यासपीठावर एकत्र येऊन नावीन्यपूर्ण उपकरणांची निर्मिती करतात. २०१४ सालापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांचे व्हिडियो पाहतात आणि एकत्रितपणे काम करून उपाययोजनेची निर्मिती करतात. प्रत्येक पथकात डॉक्टर्स, डिझायनर्स आणि इंजिनीअर्स (मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स) यांचा समावेश आहे. ते विचारमंथन करून, आराखडे काढून प्रोटोटाईप्स तयार करतात. आघाडीच्या नवनिर्मात्यांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रगत प्रशिक्षण व फेलोशिप प्राप्त करण्याची संधी मिळते. आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ‘मेधा’ची ८ पर्वे आयोजित करण्यात आली आहेत.

यंदा ‘बेटिक’, मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट ऑफ टेस्टिंग, रिसर्च अँड ट्रेनिंग, पुण्यातील व्हेंचर सेंटरआणि नागपूरमधील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या संस्थांमध्ये जुलैमधील शनिवार रविवारी ‘मेधा’चे आयोजन करणार आहे.

“पूर्तता न झालेल्या गरजा मांडणारे डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक इंजिनीअर्स यांना ‘मेधा’ एकत्र आणते. ते निदान किंवा उपचारासाठी नवीन वैद्यकीय उपकरणांच्या ठोस संकल्पना तयार करतात. या कल्पनांवर ‘बेटिक’च्या विविध केंद्रांमध्ये पुढे काम होते किंवा उत्पादने विकसित करण्यास तसेच त्यात रस असलेल्या संस्था त्यांना स्टार्टअप कंपनीद्वारे बाजारात आणण्याचे किंवा परवाने घेऊन उद्योगात आणण्याचे काम करतात. गेल्या चार वर्षांत आमच्या टीम सदस्यांनी ५० पेटंट्स फाईल केली आणि त्यातील १२ संकल्पनांसाठी परवाने मिळाले आहे. या संकलप्ना स्टार्टअप्स किंवा प्रस्थापित उद्योगांच्या माध्यमातून वास्तवात येणार आहेत. यातील अनेक कल्पनांचे उगमस्थान ‘मेधा’ होती,” असे ‘बेटिक’चे संस्थापक प्राध्यापक बी. रवी म्हणतात.

Advertisement
Advertisement
Advertisement