Published On : Fri, Jun 21st, 2019

बेले सर एज्युकेशन कन्हान व्दारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दिव्यांग अदिती यादव चा विशेष सत्कार

कन्हान: बेले सर एज्युकेशन कन्हान संचालित जिनिअस टेस्ट सिरीज व्दारे समारंभासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

बेले सर एज्युकेशन हॉल शिवनगर कन्हान येथे बेलेसर एज्युकेशन संचालित जिनिअस टेस्ट सिरीज व्दारे सत्कार समारंभ मा पुरूषोत्तम बेले उपमुख्या ध्यापक राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक यांच्या अध्यक्षेत प्रमुख अतिथी मोतीराम रहाटे अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ कन्हान, रामुजी गि-हे शिक्षक, कमलसिंह यादव पत्रकार , मोहन यादव शिक्षक सहकारी बँक कामठी आदी मान्यवरां च्या शुभ हस्ते जिनिअस टेस्ट सिरीज च्या विद्यार्थींनी धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान येथुन कु सिध्दी लोंखडे ९१% गुण प्राप्त करून प्रथम, कु मोनिका गजभिये ८४.२०% ने व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कु अदिती यादव ८४.६०% गुण प्राप्त करून कर्णबधिर दिव्यांग प्रवर्गात तालुक्यातुन प्रथम व जिल्हात तृतीय क्रमांक मिळविल्याने या विद्यार्थींनी चा पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. सत्कार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरती बालपांडे (बेले) हयानी तर आभार प्रदर्शन वर्षा वाकुडकर नी केले. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

– एम व्ही रहाटे कन्हान – ७०२०८६२७८२