Published On : Wed, Sep 18th, 2019

अधिकारी व कर्मचाऱ्याच्या समन्वयातूनच उत्तम कार्य पार पडता येतात : सवरंगपते

कामठी :- महसूल विभाग हा शासनाचा अतिमहत्त्वाचा विभाग असून या विभागामार्फत अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वय व सहकार्यातून सर्वसामान्य नागरिकांचे उत्तम कार्य पारपडता येत असल्याचे मत मौद्याचे तत्कालीन उपविभागोय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी कामठी तहसील कार्यालयात आयोजित सत्कार व निरोप समारंभ समारोहात मार्गदर्शन करताना व्यक्त केले

मौद्याचे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांची भंडारा येथे उपजिल्हाधिकारी पदी बदली, कामठी चे नायबतहसीलदार गणेश जगदाळे यांची सिंदेवाहि येथें तहसीलदार म्हणून पदोन्नती bवरिष्ठ लिपिक ओमप्रकाश होटे, सचिन करवाडे यांची विभागीय कार्यालय नागपूर येथें बदली झाल्याबादल तसेच कामठी तहसील कार्यालयात नव्यानेच मौदा येथे रुजू झालेले उपविभागीय अधिकारी श्याम मंदनूरकर यांचा सत्कार करणे या उद्देशाने उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय अधिकारी श्याम मनुरकर यांचे हस्ते दिपप्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे ,मौद्याचे तहसीलदार प्रशांत सांगळे , गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी ,नायब तहसीलदार सुनील तरुडकर, आ टी उके, रणजित दुसावार, एस एन, कवठी, आडक्याच्या सरपंच भावना चांभारे, कढोलीच्या सरपंच प्रांजल वाघ, खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे , ज्येष्ठ पत्रकार सुदाम राकडे, नितीन रावेकर, निलेश रावेकर, नंदू कोल्हे, संदीप देशपांडे, सौमित्र नंदी, राजा देशमुख आदी उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर यांचे हस्ते वंदना सवरंगपते, गणेश जगदाळे सचिन करवाडे, ओमप्रकाश होटी यांचा शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन गौराव करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी मौखिक मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्याम मंदनूरकर मार्गदर्शन करताना म्हणाले प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱयांनी समनव्याच्या भावनेतून आपआपली जवाबदारी योग्यरीत्या पार पाडली तर सहजरीत्या वेळेत कामपूर्ण करता येतात त्यामुळे विभागाचा नाव उंचावतो त्याकरिता प्रत्येकांनी आपली जवाबदारी योग्यरीत्या पारपाडण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले संचालन आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी महेश कुलदीपवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल पोळ शेख शरीफ ,राजेश काठोके ,राजेश तळस, वसुंधरा मानवटकर बेबीनंदा झोटींग, वर्षा भुजाडे, युवराज चौधरी राम उरकुडे गोरले, रवी जागले, राजेश काठोके आदींनी परिश्रम घेतले,

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement