Published On : Wed, Sep 18th, 2019

आंभोरे ब्रदर्सतर्फे संगीतमय कार्यक्रम

नागपूर: मेलोडी ऑफ मुकेश हा संगीतमय कार्यक्रम प्रभू आंभोरे व साकार आंभोरे यांच्यातर्फे शंकरनगरातील साई सभागृहात नुकताच सादर करण्यात आला. या कार्यक्रमात विविध प्रकारची संगीतमय मेजवाणी प्रेक्षकांना देण्यात आली.

संगीतकार माणीक उबाळे आणि गायिका अहिंसा तिरपुडे यांनी दिप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमात प्रभू आंभोरे, साकार आंभोरे, मोहिनी बरडे, मनीषा आंदुलकर यांनी गीते सादर केली.

अब्दुल जाहीर, प्रशांत खडसे (कि-बोर्ड), क्रिष्णा जनवारे (ढोलक), लेकराज (गिटार), अशोक ढोके (तबला), अकील खान (आक्‍टोपॅड) यांनी साथसंगत केली.