Published On : Tue, Apr 3rd, 2018

“बेटी बचाओ, बेटी पढाओ” निबंध स्पर्धा संपन्न


नागपूर: लाँयनेस क्लब कन्हान कोलसिटी व धर्मराज विद्यालय कन्हान द्वारा “बेटी बचाओ बेटी पढाओ ” या विषयावर निबंध स्पर्धा घेऊन पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.

लाँयनेस अध्यक्षा डाँ हेमलता जुनघरे यांच्या प्रमूख उपस्थितीत व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर झोड यांच्या अध्यक्षेत शाळेच्या पटांगणात कार्यक्रम निबंध स्पर्धा घेऊन प्रथम पाच विद्यार्थी प्रथम – पुरस्कार स्नेहल हेमंत राऊत, द्वितीय – जान्हवी शेवकराम शेंडे, तृतीय – स्नेहा रामकृष्ण हूड, चतूर्थ – राची जगदीश पटवा, पंचम – पूजा राजकुमार झलके या विद्यार्थींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला . कार्यक्रमास स्वाती झोड, वासनिक, विनीता भिवगडे, सविता नितनवरे, मंजू यादव व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षीका व लाँयनेस सदस्या प्रामुख्याने उपस्थितीत होते .

स्वाती झोड यांनी प्रास्ताविकातुन मुलगी ही मनुष्याची ताई, आई, पत्नी , आजी च्या रूपात कर्तृत्व करून आपले कुटुंब, समाज, गाव, आणि देशाच्या उन्नती करिता महत्त्वाची भुमिका पार पाडत असते. डाँ हेमलता जुनघरे हयानी मुली वाचविल्या, सुशिक्षित केल्याने चांगल्या प्रभावी व सक्षम समाजाची निर्मीती होऊन आपल्या देशाचे नाव जगात रोशन होईल. झोड यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात मुली व मुलीत भेदभाव न करता दोघांनाही जीवन, शिक्षण , संपत्ती आणि कर्तव्यात समान अधिकार दिला पाहिजे . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जोशी तर आभार सुनील लाडेकर गूरूजी यांनी व्यकत केले .