Advertisement
नागपूर: उद्या मंगळवार दिनांक 8 रोजी साजरा होणार्या विजयादशमी व धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयादशमी हे सत्याचा असत्यावर झालेल्या विजयाचे प्रतीक असून दुष्प्रवृत्तींचा नाश झाल्याचा दिवस आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी बौध्द बांधवांना बौध्द दीक्षाभूमीवर धम्माची दीक्षा दिली होती. संपूर्ण जगाने गौतम बुध्दाचे तत्त्वज्ञान अंगिकारले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळेच आज लोकशाही या देशात रुजली आहे. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेंपल येथेही लाखो भाविक धम्मचक्र प्रवर्तन उत्सवात सहभागी होत असतात. या सर्व भाविकांना आणि नागरिकांना शुभेच्छा पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत.