Published On : Mon, May 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

विधान परिषद निवडणुकीआधी महायुतीत जागावाटपावर खल; कोणत्या मतदारसंघांवर अजूनही पेच? फडणवीस म्हणाले…

Advertisement

मुंबई : विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागांवर दावा करत असल्याने काही मतदारसंघांवर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही.

महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये याबाबत सातत्याने बैठका आणि चर्चा सुरू असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, हिंगोली-परभणी मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. याशिवाय पुणे मतदारसंघासाठीही राष्ट्रवादी आग्रही असल्याचे समजते. कोकण आणि हिंगोली-परभणी या जागांवरही राष्ट्रवादीने दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही जागांवर अद्याप चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघांबाबत शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुणे जागेबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असून सर्व पक्ष एकत्र बसून तोडगा काढतील, असेही त्यांनी म्हटले.

Advertisement

महायुतीतील संभाव्य जागावाटपाचाही अंदाज समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय जनता पक्ष सुमारे १२ जागांवर उमेदवार देऊ शकतो. शिवसेना शिंदे गट चार जागा लढवण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंतिम जागावाटपावर अजून शिक्कामोर्तब झाले नसले तरी पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू असून पुढील काही दिवसांत महायुतीचा अंतिम फॉर्म्युला स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges