नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि तटकरे कुटुंबीयांच्या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “शरद पवार आणि तटकरे यांच्या भेटीकडे राजकीय चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. तटकरे कुटुंबीयांनी आयुष्यभर शरद पवार यांच्यासोबत राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक नातं जपलं आहे. त्यामुळे अशा भेटींमध्ये वेगळा अर्थ काढू नये,” असे बावनकुळे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “मी स्वतःही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. प्रत्येक भेटीचा राजकीय संदर्भ लावणे योग्य नाही.”
दरम्यान, मतीन घरपाडकाम प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी गंभीर आरोप असलेल्या आरोपींना आश्रय देणे चुकीचे असल्याचे म्हटले. “समाज हादरवणाऱ्या प्रकरणांतील आरोपींना मदत करणे ही चुकीची संस्कृती आहे. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्णय घेतला असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
परभणीतील वाळू माफिया प्रकरणावर त्यांनी कठोर भूमिका घेत, “अशा आरोपींना सोडणार नाही. बुलढाण्यात तहसीलदारांवरील हल्ल्यानंतर आम्ही तातडीने कारवाई केली होती. या प्रकरणातही आरोपींचा गुन्हेगारी इतिहास तपासून कठोर कारवाई होईल,” असा इशारा दिला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार पुढील १५ दिवसांत केंद्र सरकारकडे पुन्हा पाठपुरावा केला जाणार आहे.
काटकसरीच्या सूचनांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, प्रशासनातील खर्च कमी करण्यासाठी ऑनलाइन बैठका, अनावश्यक दौरे टाळणे यांसारखे उपाय सुरू करण्यात आले आहेत. “पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
पीएमच्या काटकसर सूचनांवर भाष्य करताना बावनकुळे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी , माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम आणि ममता गांधी यांच्या स्वदेशी आणि बचतीच्या आवाहनांची आठवण करून दिली. “देश मजबूत करण्यासाठी काही काळ काटकसर करावी लागली तर त्यात गैर काहीच नाही,” असे त्यांनी नमूद केले.
कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate
कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ...





