Published On : Wed, May 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

CBSE 12वीचा निकाल जाहीर; यंदा 85.20% विद्यार्थी उत्तीर्ण, निकालात घसरण

Advertisement

नवी दिल्ली : Central Board of Secondary Education अर्थात CBSE बोर्डाने इयत्ता 12वीचा 2026 चा निकाल जाहीर केला आहे. यंदा निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसून आले आहे. या वर्षी 85.20 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्या वर्षी हा आकडा 88.39 टक्के होता.

यंदाच्या परीक्षेत 18.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यामुळे मूल्यांकन प्रक्रियेला काहीसा विलंब झाला. मात्र, डिजिटल पद्धतीने तपासणी करण्यात आल्याने निकाल अधिक पारदर्शक झाल्याचा दावा बोर्डाकडून करण्यात आला आहे.

Gold Rate
June 09 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 152,700 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,43,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

निकाल जाहीर होताच विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आता महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेलाही वेग येणार आहे.

असा पाहा निकाल-
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम CBSE Results Portal किंवा CBSE Official Website या संकेतस्थळावर जावे.
होमपेजवरील “Class 12th Result 2026” या लिंकवर क्लिक केल्यानंतर रोल नंबर, स्कूल कोड आणि अॅडमिट कार्डवरील आयडी टाकावी लागेल. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करताच निकाल स्क्रीनवर दिसेल.

विद्यार्थ्यांनी भविष्यातील प्रवेश प्रक्रिया आणि इतर कामांसाठी मार्कशीटची पीडीएफ कॉपी सेव करून प्रिंटआउट काढून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिलॉकरवरूनही मार्कशीट उपलब्ध-
CBSE बोर्डाकडून विद्यार्थ्यांना डिजिटल मार्कशीटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी DigiLocker अॅप किंवा वेबसाईटवर जाऊन ‘Education’ विभागात CBSE निवडावे लागेल. त्यानंतर पासिंग इयर 2026 आणि रोल नंबर टाकल्यानंतर डिजिटल स्वाक्षरी असलेली मार्कशीट डाउनलोड करता येणार आहे.

ही डिजिटल मार्कशीट महाविद्यालयीन प्रवेश तसेच सरकारी प्रक्रियांसाठी वैध मानली जाणार आहे.

टॉपर विद्यार्थ्यांची संख्याही वाढली-
CBSE बोर्डाच्या आकडेवारीनुसार, 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2025 मध्ये 1.11 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले होते, तर सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा अधिक गुणांची कामगिरी केली होती.बोर्डाच्या मते, नवीन मूल्यांकन पद्धती आणि विद्यार्थ्यांची सुधारलेली तयारी यामुळे उच्च गुण मिळवणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की लूट.. #nagpurnews #Crime #LatestNews

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की...

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews #sucides

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges