Published On : Sat, Jul 13th, 2019

पालकमंत्री रविवारी रवीभवन येथे नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध

नागपूर: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवार दिनांक 14 जुलै रोजी रवीभवन कॉटेज क्रमांक 5 सिव्हिल लाईन नागपूर येथे नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

रविवार दिनांक 14 रोजी पालकमंत्री सकाळी 9 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत नागरिकांना भेटण्यासाठी कॉटेज क्रमांक 5 येथे उपलब्ध राहतील.

पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडे समस्या घेऊन येणार्‍या नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात मोबाईल नंबरसह आणाव्या, अशी विनंती पालकमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आली आहे.