Published On : Mon, Jul 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

बारसं कुणाचंही असो, त्यांना लाडू खाऊ द्या…; ठाकरे बंधूंना चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

Advertisement

नागपूर : राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडताना ठाकरे बंधूंवरही जोरदार टीका केली. “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना… बारसं कुणाचंही असो, त्यांना लाडू खाऊ द्या,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला.

पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, यंदा कमी पावसामुळे धान पिकाला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धारणी येथील आश्रमातील विषबाधा प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. अन्न व औषध प्रशासनाकडूनही चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा घटना टाळण्यासाठी आश्रमांतील स्वयंपाकघरांचे विकेंद्रीकरण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्व विद्यार्थ्यांवर योग्य उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रोहित पवार यांच्या पेपरफुटीवरील टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, पेपरफुटी करणाऱ्यांविरोधात केंद्र आणि राज्य सरकार कठोर भूमिका घेत आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या विषयावर पंतप्रधान स्वतः लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement

जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नावर ओबीसी विभागाने शासन निर्णय जारी केला असून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हलबा समाजाच्या काही मागण्यांचाही सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या जेसीबी मशीनचा वापर केवळ अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठीच केला जाईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी मनपा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

नव्या E-20 पक्षाबाबत विचारले असता, लोकशाहीत प्रत्येकाला पक्ष स्थापन करण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांच्या भूमिका आणि मागण्या पाहून पुढे मत व्यक्त करू, असे बावनकुळे म्हणाले.

राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर बोलताना प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत धरणांतील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि आपत्तीग्रस्त भागांचा आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

एचएसआरपी (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) संदर्भात सरकारने वारंवार आवाहन करूनही नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पुढील काळात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सिमेंट रस्ते खोदण्याच्या मुद्द्यावर आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगत, जमिनीखालील केबल, वीजवाहिन्या किंवा पाईपलाईनची खात्री करूनच रस्ते खोदण्याचे नियोजन केले जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.