Published On : Wed, Jun 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘ऑपरेशन टायगर’वरून बावनकुळेंचा पलटवार; खासदार सांभाळता येत नाहीत, अन् आरोप भाजपवर करता!

Advertisement

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या कथित नाराजीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेने जोर धरताच भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.

“भाजपचा ‘ऑपरेशन टायगर’शी काहीही संबंध नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी आधी स्वतःच्या पक्षात काय सुरू आहे, हे पाहावे. आमदार, खासदार आणि पदाधिकारी पक्ष सोडून का जात आहेत, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले.

Gold Rate
July 30 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,18,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील सहा खासदार दिल्लीत सक्रिय असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा असताना भाजपने मात्र यापासून हात झटकले आहेत. उलट या घडामोडींमागे ठाकरे गटातील अंतर्गत अस्वस्थताच कारणीभूत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

संजय राऊत यांनी खासदारांना १५ कोटी रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यावरही बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “पुरावा नसताना रोज सकाळी उठून आरोप करणे हा काही राजकारणाचा विषय नाही. पक्षात सुरू असलेली गळती रोखण्यात अपयशी ठरलेले नेते आता भाजपवर आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

Advertisement

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे स्थिर असून महाराष्ट्राला मजबूत नेतृत्व मिळाले आहे, असे सांगत बावनकुळे यांनी विरोधकांच्या सर्व दाव्यांना फेटाळून लावले.

एकीकडे ठाकरे गटातील खासदारांच्या हालचाली आणि दुसरीकडे भाजपची आक्रमक भूमिका यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ ही केवळ राजकीय अफवा आहे की नव्या राजकीय भूकंपाची नांदी, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement
निर्मल उज्ज्वल के प्रमोटर के घर पहुंचे जमाकर्ता | "हमारा पैसा वापस करो" | Nagpur News | Viral Video

निर्मल उज्ज्वल के प्रमोटर के घर पहुंचे जमाकर्ता | "हमारा पैसा वापस...

NagpurCrime : नागपुर में काली बाइक गैंग का आतंक; एक दिन में 3 जगह वारदात #Nagpur #NagpurNews #Crime

NagpurCrime : नागपुर में काली बाइक गैंग का आतंक; एक दिन में...

Amravati: दर्यापुर के ज्वेलर्स में हथियारबंद डकैती #Amravati #jewellery  #Robbery #Crime #Robbery

Amravati: दर्यापुर के ज्वेलर्स में हथियारबंद डकैती #Amravati #jewellery #Robbery #Crime #Robbery

Nagpur: Cotton Market की सद्गुरु सेल्स में भीषण आग #Nagpur #NagpurNews #FireAccident #FireBrigade

Nagpur: Cotton Market की सद्गुरु सेल्स में भीषण आग #Nagpur #NagpurNews #FireAccident...

Nagpur: हिस्ट्रीशीटर पुलिस कस्टडी से फरार #Nagpur #NagpurNews  #HistorySheeter #PoliceCustody #Crime

Nagpur: हिस्ट्रीशीटर पुलिस कस्टडी से फरार #Nagpur #NagpurNews #HistorySheeter #PoliceCustody #Crime

रोकड़े ज्वैलर्स ने पेश किया अपना नया ब्रांड लोगो #nagpur #nagpurnews #RokdeJewellers #jwellers

रोकड़े ज्वैलर्स ने पेश किया अपना नया ब्रांड लोगो #nagpur #nagpurnews #RokdeJewellers...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges