Published On : Wed, Jun 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात शाळांच्या वाहतूक व्यवस्थेवर उच्च न्यायालयाची नजर; माहिती न दिल्यास ५० हजारांचा दंड!

Advertisement

नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय वाहतूक व्यवस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यातील मान्यताप्राप्त सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी गेल्या दोन वर्षांतील परिवहन समितीच्या बैठकींचा तपशील तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बस आणि अन्य वाहनांची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या शाळांवर ५० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. जनहित याचिका क्रमांक २/२०१२ अंतर्गत १६ फेब्रुवारी, ६ मार्च आणि १७ मार्च २०२६ रोजी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने ही माहिती मागविण्यात आली आहे.

Gold Rate
June 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 50,600 /-
Gold 22 KT ₹ 1,39,800 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बस, व्हॅन किंवा इतर वाहनांची संपूर्ण यादी सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शाळांमधील परिवहन समितीच्या कामकाजाचा तपशीलही न्यायालयाला सादर करावा लागणार आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जून रोजी होणार असून नागपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि व्यवस्थापन यांना आवश्यक माहिती प्रतिज्ञापत्रासह निर्धारित मुदतीपूर्वी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांनी यासंदर्भात सार्वजनिक सूचना जारी केली असून, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतील सुरक्षितता आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले आहे.

उच्च न्यायालयाच्या या भूमिकेमुळे शालेय वाहतूक व्यवस्थेतील नियमपालन, वाहनांची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या उपाययोजनांची अधिक काटेकोर तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
आरटीआई में चौंकाने वाला खुलासा सामने आया.. #maharashtranews #latestnews #newsupdate

आरटीआई में चौंकाने वाला खुलासा सामने आया.. #maharashtranews #latestnews #newsupdate

42 डिग्री तापमान से जनजीवन प्रभावित ...#news #newsupdate #latestnews #vidarbha #maharashtranews

42 डिग्री तापमान से जनजीवन प्रभावित ...#news #newsupdate #latestnews #vidarbha #maharashtranews

MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन बाप-बेटा गिरफ्तार..#nagpurnews #crime #mddrugs #latestnews

MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन बाप-बेटा गिरफ्तार..#nagpurnews #crime #mddrugs #latestnews

भोजन की तलाश में बस्ती पहुंचा भालू ...#news #newsupdate #vidarbha #maharashtra

भोजन की तलाश में बस्ती पहुंचा भालू ...#news #newsupdate #vidarbha #maharashtra

ऑपरेशन टाइगर पर देशमुख का बड़ा बयान; ‘15 करोड़’ की चर्चा #nagpurnews #anildeshmukh #politicsnews

ऑपरेशन टाइगर पर देशमुख का बड़ा बयान; ‘15 करोड़’ की चर्चा #nagpurnews...

गोमूत्र विवाद पर राजनीति हुई गरम ...#news #latestnews #update #maharashtranews #maharashtra

गोमूत्र विवाद पर राजनीति हुई गरम ...#news #latestnews #update #maharashtranews #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges