Published On : Thu, Aug 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

जात पडताळणी समितीच्या कामात हस्तक्षेप शक्य नाही; नार्को टेस्टलाही संमती – बावनकुळे

Advertisement

मुंबई: जात पडताळणी समितीच्या कामकाजात सरकार किंवा कोणत्याही मंत्र्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “माझी नार्को टेस्ट करण्यास माझी पूर्ण संमती आहे,” असे विधान केले.

मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, जात पडताळणी समितीला अर्धन्यायिक अधिकार आहेत आणि तिचे काम स्वतंत्रपणे चालते. त्यामुळे कोणत्याही मंत्र्याच्या सांगण्यावरून जात प्रमाणपत्रे रद्द झाली, असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ते म्हणाले, “जात पडताळणी समितीचा निर्णय अंतिम नसतो. एखाद्याला निर्णयाबाबत अन्याय झाल्याचे वाटत असेल, तर त्याला उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे.”

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, “मी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार नाही. मी फक्त वस्तुस्थिती मांडत आहे. महसूल मंत्री असलो तरी मी जात पडताळणी समितीला फोन करून निर्णय बदलण्यास सांगू शकत नाही.”

Advertisement

ते पुढे म्हणाले की, सरकारला केवळ कोणाची जात प्रमाणपत्रे रद्द झाली याची माहिती मिळते. मात्र, समितीच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही.

जात पडताळणी समितीच्या निर्णयांबाबत शंका असल्यास संबंधितांनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार दाद मागावी, असे आवाहनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.