Published On : Thu, Aug 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सावजी विदर्भाची शान; रेस्टॉरंट्सबाबत अशी वक्तव्ये करू नका – बावनकुळे

Advertisement

मुंबई: सावजी हा विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असून हजारो कुटुंबांच्या रोजगाराचा आधार आहे. त्यामुळे सावजी रेस्टॉरंट्स बंद पडतील किंवा संपूर्ण उद्योगावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी सरसकट वक्तव्ये अधिकाऱ्यांनी करू नयेत, असा स्पष्ट इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी ही भूमिका मांडली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंढे यांनी कार्यक्रमात, “मी जर हे सावजी मटण खाल्ले, तर महिनाभर आजारी पडेन आणि हॉस्पिटलमध्ये जावे लागेल,” असे विधान केले होते. या वक्तव्यानंतर सावजी रेस्टॉरंट चालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, विदर्भात तीन-चार पिढ्यांपासून सावजी रेस्टॉरंट्स प्रामाणिकपणे सुरू आहेत. सावजी ही मसाले आणि खाद्यपदार्थ बनवण्याची पारंपरिक व वैशिष्ट्यपूर्ण पद्धत असून, विदर्भात येणाऱ्या पर्यटकांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये या खाद्यसंस्कृतीची मोठी लोकप्रियता आहे.

Advertisement

ते पुढे म्हणाले की, आज सावजी पदार्थांना देशासह परदेशातही मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत एका अधिकाऱ्याने संपूर्ण उद्योगाबाबत नकारात्मक टिप्पणी करणे योग्य नाही.

महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की, एखाद्या ठिकाणी अन्नात भेसळ किंवा आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या बाबी आढळल्यास त्या संबंधित आस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, संपूर्ण सावजी व्यवसायाला लक्ष्य करणे चुकीचे आहे.

“हा केवळ रेस्टॉरंट व्यवसाय नसून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार असलेला गृहउद्योग आहे. त्यामुळे या व्यवसायावर परिणाम होईल किंवा रेस्टॉरंट्स बंद पडतील, अशा प्रकारची विधाने अधिकाऱ्यांनी टाळावीत,” असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.