Published On : Fri, Sep 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत बेस स्कूलचा अंडर-१९ बॉईज संघ उपविजेता

Advertisement

शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत बेस स्कूलचा अंडर-१९ बॉईज संघ उपविजेता

नागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या वतीने १५ व १६ सप्टेंबर २०२६ रोजी बेस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोराडी रोड, नागपूर येथे शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेतील अंडर-१९ बॉईज गटात भोसला मिलिटरी स्कूलच्या संघाने विजेतेपद, तर बेस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. बेस स्कूलच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट चपळाई, कौशल्य, शिस्त आणि सांघिक भावनेचे प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बेस स्कूलच्या अंडर-१९ बॉईज संघातील खेळाडू :
अजिंक्य कश्यप, लक्ष महेपेकर, रुपेश मिश्रा, निकित गुरनानी, त्रिशल गिरी, तुषार महल्ले, केतन सिंग चौहान, ईशान भावने, आहान खान, आरव रविंद्र वार्कडे, अथर्व महाजन आणि वीर शेंडे.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ग्रामीणचे संयोजक श्री. उमेश चौरे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

Advertisement

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे संचालक श्री. दिनेश गौर, श्री. सोनू बुर्रेवार व श्री. नरेंद्र वानखेडे, प्राचार्य श्री. गौरव माहुले तसेच समस्त शिक्षक-शिक्षिकांनी अंडर-१९ बॉईज संघातील खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या यशामागे प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक श्री. लाल सिंह यादव यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी आत्मविश्वासाने, उत्कृष्ट कौशल्य आणि सांघिक समन्वयाने आपला खेळ सादर केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.