Published On : Mon, Jul 20th, 2020

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बार्गेन्स फ्री डॉट कॉम या इ-कॉमर्स शॉपिंग संकेतस्थळाच उद्घाटन

नागपूर: विदर्भातील सुक्ष्म लघु व मध्यम उद्योजक यांच्यामार्फत निर्मित विविध उत्पादनांना त्यांच्या विपननासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी ‘बार्गेन्स फ्री डॉट कॉम’ या इकॉमर्स शॉपिंग संकेतस्थळाच उद्घाटन आज नागपूरमध्ये केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून करण्यात आल. याप्रसंगी गडकरी यांनी या संकेतस्थळावरून उत्पादनांच्या विक्री होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

बार्गेन्स फ्री डॉट कॉम या इकॉमर्स शॉपिंग संकेतस्थळाची संकल्पना ही ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियान यातून समोर आली. कोविड -19 दरम्यान लागलेली टाळेबंदी तसेच मिशन बिगीन अगेन अंतर्गत सुद्धा उद्योग व व्यवसाय हव्या त्या जोमाने सुरू न झाल्याने उद्योजकांचे उत्पादनेही विक्रीविना पडून आहेत .या सर्व उत्पादनांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत थेट सवलतीच्या दरात पोहोचवण्यासाठी ‘बार्गेन्स फ्री ही’ संकल्पना राबविल्याच बार्गेन्स फ्री डॉट कॉमचे प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक मोनाल थुल यांनी यावेळी सांगितलं.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

https://bargainsfree.com/ या संकेतस्थळावर विविध प्रकारची उत्पादने विक्रीसाठी आजपासून उपलब्ध झाली आहेत.

या उद्‌घाटन कार्यक्रमाप्रसंगी विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे – र्व्हीआयएचे पदाधिकारी श्री गिरधारी मंत्री, बायोकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संस्थापक डॉ. सुहास बुद्धे तसेच बायोकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एंटरप्राइझ बिझिनेस एण्ड एक्सपोर्ट्स प्रमुख सतीश खराबे उपस्थित होते.

Advertisement
Advertisement