Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Aug 13th, 2020

  बँक कर्मचाºयांचेही सायबर गुन्ह्यात संबंध?

  – कर्मचाºयांनीच फसवणूक करीत ग्राहकाचे दोन लाख उडविले

  नागपूर: लॉकडाऊन काळात सामान्य जनता, चाकरमाने व व्यापारीवर्गाला सर्वात मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली. मात्र सायबर गुन्हेगारांना लॉकडाऊनचा हा काळ फारच सुगीचा काळ होता. सर्वाधिक गुन्हे सायबर सेलमध्ये नोंद झालेले आहेत. यातून गुन्हेगारांनी कोट्यवधी रुपये बँक खात्यातून उडविले आहेत. मात्र या गुन्हेगारांना खातेधारकांची माहिती पुरविणारे बँकेचे अधिकारी व कर्मचारीच असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
  असाच एक सायबर क्राईमचा गुन्हा नागपुरातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) कामठी मार्गावरील १० नंबर पूल या शाखेत घडला आहे. मात्र या प्रकरणाची माहिती व्यवस्थापकासह कुणीही देण्यास तयार नाही. खातेधारकाच्या खात्यातून तब्बल दोन लाखांच्या जवळपास रक्कम परस्पर लंपास करण्यात आली. अंगेश प्रभूनाथ राऊत असे फिर्याद कर्त्याचे नाव आहे.

  फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, कामठी मार्गावरील १० नंबर पूल येथील एसबीआयच्या शाखेत त्यांचे पीपीएफ खाते (खाते क्र.३३३७९०२८११४) याच खाखेत अंगेश राऊत व त्यांची आई गिरजा राऊत यांचे संयुक्तीक खाते (क्र.३१७२४६११८४८) आहे. अंगेश राऊत यांना आर्थिक अडचण आल्याने त्यांनी ६ नोव्हेंबर २०१९ रोजी पीपीएफ खाते बंद करण्यासाठी बँकेला अर्ज केला. त्यावेळी त्यांच्या खात्यात २ लाख ८३ हजार ३४९ रुपये एवढी रक्कम होती. ६/११/२०१९ रोजी खाते बंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा कर्तव्यावर सुरेंद्र डोंगरे (अकाऊंटन्ट) व यादवराव खरपडे (लिपिक) हे दोघे होते. त्यांनी खातेधारक राऊत यांच्याकडून दोन व्हावचर भरून घेतले आणि राऊत यांच्या संयुक्तीक खात्यात (क्र.३१७२४६११८४८) फक्त ८९ हजार रुपये वळते (ट्रान्सफर) केले. २,८३,३४९ रुपयांपैकी ८९ हजार वळते झाल्यानंतर शिल्लक १,९५,३४१ रु. मार्च २०२० मध्ये व्याजासह तुमच्या खात्यात जमा होतील, असे सांगून राऊत यांना बँकेतून जाण्यास सांगितले.

  याच दरम्यान बँकेच्या उपरोक्त दोन्ही कर्मचाºयांनी संगनमत करून राऊत यांच्या पीपीएक खात्यातून शिल्लक रु. १,९५,३४१ रक्कम त्यांच्या संयुक्तीक खात्यात (क्र.३१७२४६११८४८) वळते केले आणि राऊत यांना कुठलीही माहिती किंवा मोबाईलवर मॅसेज न देता, त्यांच्या खात्यातून ही रक्कम परस्पर विड्राल केली. याची साधी कल्पनाही राऊत यांना नव्हती. मार्च ते जून या काळात कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे राऊत बँकेत या कामासाठी गेले नाही.

  अचानक त्यांना आॅगस्ट महिन्यात पैशाची अडचण निर्माण झाली. त्यामुळे ते ३/०८/२०२० रोजी बँकेत शिल्लक रक्कमेबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांची शिल्लक रक्कम रु. १,९५,३४१ त्याच वेळी म्हणजे ६/११/२०१९ रोजीच त्यांच्या संयुक्तीक खात्यात (क्र.३१७२४६११८४८) वळती झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी खात्याचे स्टेटमेंट घेतले असता उपरोक्त रक्कम ९/१०/२०१९ रोजी त्यांच्या खात्यात जमा झाल्याची नोंद आहे. मात्र राऊत यांनी ६/११/२०१९ रोजी खाते बंद करण्यासाठी अर्ज दिला, मग अर्ज देण्यापूर्वीच ९/१०/२०१९ रोजी उपरोक्त रक्कम बँकेने ट्रान्सफर केली कसी? हे एक कोडेच आहे.

  बँकेचे कर्मचारी सुरेंद्र डोंगरे व यादवराव खरपडे यांनीच रु. १,९५,३४१ ही रक्कम परस्पर खात्यातून काढल्याचा आरोप अंगेश राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस आयुक्त, सायबर सेल, शाखा व्यवस्थापक, एसबीआयची मुख्य शाखा, संबंधित पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. आता या प्रकरणात आरोपींवर काय कारवाई होते


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145