Advertisement
नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे कामगार केसरी बॅ.रामभाऊ रूईकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चिटणीस पार्क येथील पुतळ्याला गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे यांनी पुष्पहार चढवून त्यांना अभिवादन केले.
यावेळी श्रीकांत देशपांडे, मुकुंद मुळे, अरविंद जयस्वाल, डॉ.महादेवराव नगराळे, सुरेश आसरे, प्रकाश सहस्त्रबुद्धे, दिलीप पाठक, राजेश वासनिक उपस्थित होते.