Published On : Fri, Jan 24th, 2020

नागपूरमध्ये गडकरी आणि फडणवीसांची बोलिंग, हार्दिक पांड्याची जोरदार फटकेबाजी

नागपूर : राजकारणात आपल्या अनेक वक्तव्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना गुगली टाकणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये खरीखुरी बोलिंग केली (Nitin Gadkari Devendra Fadnavis ball Hardik Pandya). ही बोलिंग दुसरं तिसरं कुणाला नाही, तर थेट भारतीय क्रिकेटसंघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला केली आहे. ते नागपूरमध्ये सुरु असलेल्या खासदार क्रीडा महोत्सावाच्या समारोप प्रसंगी आले असताना खेळत होते. या दुर्मिळ योगायोगाने नागपूरकरांना मात्र चांगलाच आनंद झाला.

Advertisement

नागपूरमधील खासदार क्रीडा महोत्सवाचा आज (24 जानेवारी) समारोप झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारताचा प्रसिद्ध स्फोटक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या उपस्थित होते. यावेळी मंचावरच या दिग्गजांचा क्रिकेट सामना रंगला. गडकरी आणि फडणवीस यांनी हार्दिक पांड्याला गोलंदाजी केली. यावेळी पांड्याने जोरदार फटकेबाजी केली.

Advertisement

नागपूरमधील क्रीडा प्रेमींसाठी हार्दिक पांड्याची कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती विशेष आकर्षित ठरली. यावेळी त्यालाही प्रेक्षकांसह सेल्फी घेण्याची मोह आवरला नाही आणि त्याने सेल्फी घेत क्रीडा प्रेमींच्या उत्साहात भर टाकली. यावेळी हार्दिक पांड्याची मुलाखत देखील घेण्यात आली. हार्दिकने या मुलाखतीत सावधपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement