Published On : Thu, Mar 5th, 2020

बाळाची काळजी घेण्यासाठी मिळाली ‘बेबी केअर किट’

Advertisement

कामठी :-एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग कामठी च्या वतीने प्रभाग क्र 14 मधील बुद्धनगर अंगणवाडीत नोंदणी केलेल्या नवजात बालिकेची माता पूजा दुर्गेश शेंडे ला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ धीरज चोखांद्रे यांच्या शुभ हस्ते बाळाची काळजी घेणारी ‘बेबी केअर किट’ वितरण करण्यात आली.

नवजात बालक बालिकेचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रसूती नंतर जन्माला येणाऱ्या बालकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठराविक साहित्य असलेली बेबी केअर किट पुरविण्याची योजना सन 2018 मध्ये आखण्यात आली मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता केली जात असून एकात्मिक बाल विकास विभाग योजना कामठी शहर व ग्रामीण भागातील कार्यालयात शेकडोच्या वर बेबी केअर किट वितरणा साठी पुरवठा करण्यात आल्या आहेत .

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानुसार लीप वर्ष मानल्या जाणाऱ्या 29 फेब्रुवारीला जन्मास आलेली नवजात बालिका पूजा दुर्गेश शेंडे यांच्या नवजात बालिकेला बेबी केअर किट देऊन बाळाची काळजी घेणाऱ्या बेबी केअर किट वितरण चा शुभारंभ करण्यात आला.या बेबी केअर किट मध्ये नवजात बालकाचे कपडे, लंगोट, झोपण्याची लहान गादी, टॉवेल, तापमापक यंत्र,अंगाला लावण्याचे 250 मी ली तेल, मचचरदानी , छोट्या आकाराचे ब्लॅंकेट, लहानशी चटई, 60 मिली श्याम्पपू, खेळणी खुळखुळा, नख काटण्यासाठी नेलकटर, हातमोजे,पायमोजे, आईसाठी हात धुण्याचे लिक्विड, लोकरीचा कापड, बॉडी वॉश लिक्विड, व सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग आदी साहित्याचा या किटमध्ये समावेश आहे.आरोग्यासाठी हितकारक अशी ही योजना असून बाळाचा आहार आणि स्वच्छतेबाबत मातांना विशेष काळजी घ्यावी लागते.स्वच्छता नसली तर विविध आजारांना निमंत्रण मिळते .मुले सुदृढ ठेवण्यासाठी मिळालेली किट ही अत्यंत फायदेशीर असल्याचे मत लाभार्थी माता पूजा दुर्गेश शेंडे यांनी व्यक्त केले आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement