Published On : Mon, Jun 24th, 2019

गोंडेगाव ग्राम पंचायत उपचुनावात कृणाल मधुमटके विजयी

Advertisement

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव ग्राम पंचायत उपचुनाव शांततेने संपन्न होऊन सोमवारला झालेल्या मत मोजणीत ग्रा.प.सदस्य म्हणुन कृणाल मधुमटके विजयी झाले.

गोंडेगाव गाम पंचायंत वार्ड क्रंमाक चार चे ग्राम पंचायत सदस्य व उपसरपंच विनोद सोमकुंवरची दि.२९ जुन २०१८ ला जुन्या वादातून भरदिवसा तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. यामुळे सदस्य व उपसरपंच पदाची जागा रिक्त असल्याने पद भरून काढण्याकरी ता रविवार (दि.२४) ला पोट निवडणूक घेण्यात आली. गोंडेगाव ग्रा प वार्ड क्र ४ मध्ये एकुण ९२५ मतदार असुन ४८.९७ टक्के मतदान झाले यामध्ये महिला२१६, पुरुष २३७ असे एकुण ४५३ मतदारांनी रिंगणात असलेल्या दोन उमेदवाराना मतदान केले.

सोमवार (दि.२४) ला तहसिल कार्यालय पारशिवनी येथे झाले ल्या मतमोजणीत कृणाल मधुमटके ला २३३ आणि कमलेश गजभिये २११ मतदान मिळाल्याने २२ मतांनी कृणाल मधुमटके विजयी झाल्याचे निवडणुक अधिकारी, तहसिलदार वरूणकुमार सहारे हयानी घोषित केले.

ग्राम पंचायत गोंडेगाव कार्यालयात सरपंच नितेश राऊत, रेल्वे समिती सदस्य महेंद्र भुरे , उपसरपंच सुभाष डोकरीमारे हयांच्या हस्ते विजयी उमेदवार कुणाल मधुमटके यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून मिठाई वाटुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी ग्रां.पं. सदस्य पंकज गोंडाने, अमोल साकोरे, सुनील शेंडे, राहुल टेकाम, धनराज कुंभलकर, राजु पाटील, उमेश कुंभलकर, विजेंद्र मधुमटके सह ग्रामस्थानी उपस्थित राहुन अभिनंदन केले.