Published On : Thu, Jun 17th, 2021

बाहुबली,कटप्पा व शिवगामीदेवी धानाच्या बियानास्वरूपात अवतरले तालुक्यात

Advertisement

कामठी :- उन्हाळ्यात शेतीची मशागत केल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतजमीन पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे.काही शेतकऱ्यांनी घरचेच बी बियाणे तयार करून धान परहे भरणीसाठी सज्ज केलेले आहेत तर बाजारपेठेत प्रथमताच नव्या नव्या वाणाचे धान विक्रीला आले असून या धान विक्रीला आलेल्या बियाण्यातुन बाहुबली चित्रपटातून प्रसिद्धि पावलेले बाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी प्रत्यक्षात कामठी तालुक्यात अवतरले आहेत.

मागील काही वर्षांपूर्वी एचएमटी, चिंनोर, जयश्रीराम यासारख्या वाणाच्या धान बियानाला मोठी मागणी होतो परंतु आता बाहुबली या चित्रपटवरून धानाच्या बारीक वाणाला एका खाजगी कंपनीने बाहुबली हे नाव दिले आहे सोबतच बाहुबलीचा मामा कटप्पा हे ठोकळ वाणाला नाव दिले आहे तर एका कंपनीने बाहुबलिची आई शिवगामीदेवी हिचेही नाव बियाण्यांना देण्यात आले असून कामठी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात सदर बियाणे विक्रीस आले आहेत.

बाजारात आलेल्या धानाच्या बियानापैकी बाहुबली, कटप्पा,शिवगामी सोबतच श्वेता, पूर्णिमा, पुष्पां, सुमन, मनाली, प्रणाली, यशोधा, परंपरा, अहिल्या, महालक्ष्मी, गीतांजली , लक्ष्मी अशीही महिलांची नावे देण्यात आली आहेत.बियाण्यांची अशी प्रसिद्धी व अफलातून नावे शेतकऱ्यांना आकर्षित करीत असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे