Published On : Thu, May 17th, 2018

रेल्वे स्थानकावरी बॅगेज स्कॅनर बंद

Advertisement

Nagpur Railway Station

नागपूर: नागपूर रेल्वे स्थानकावरील बॅगेज स्कॅनर गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाची मॅन्युअली तपासणी केली जात आहे. सर्वच प्रवाशांची तपासणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

रेल्वे स्थानकावर पूर्व आणि पश्चिम असे दोन मुख्य प्रवेशव्दार आहेत. दोन्ही प्रवेशव्दारावर बॅगेज स्कॅनर बसविण्यात आले. २४ तास हे स्कॅनर सुरू असते. अर्थात येथे आरपीएफ जवान प्रत्येक प्रवाशाच्या सामानाची तपासणी करुनच त्याला आत सोडले जाते. नागपूर मार्गे दररोज १५० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या धावतात. तसेच ३० ते ३५ हजार प्रवाशांची रेलचेल असते. दोन मुख्य प्रवेशव्दार सोडल्यास अनेक अनाधिकृत प्रवेशव्दार आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न तर नेहमीच कायम राहीला आहे. आता गेल्या २० दिवसांपासून पश्चिम प्रवेशव्दारावरील बॅगेज स्कॅनर बंद असल्याने काही प्रवासी तर तपासणी न करताच आत जातात. कारण एकटा कर्मचारी सर्वांच्याच सामानाची तपासणी करु शकत नाही. अशा वेळी शस्त्र, दारू किंवा अन्य वस्तु कोणी घेऊन जात असेल तर… असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे.

या बॅगेज स्कॅनरची देखभार करण्यासाठी हैदराबाद येथील एका कंपनीशी करार आहे. या कंपनीचे प्रतिनिधी नियमीत मशिनची देखभाल करायचे. आता हा करार संपला की आणखी काय समस्या आहे. या बाबतीत काहीच कळू शकले नाही. विशेष म्हणजे स्कॅनर मशिन कशामुळे बंद पडली, कधी दुरूस्त होईल याविषयी कोणालाच काही माहिती नाही. आधीच नागपूर मार्गे अंमली पदार्थाची तस्करी होते. त्यात मशिन बंद पडल्यामुळे तस्करी करणाºयांना चांगलीच संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेतला जात असेल यात शंका नाही.