अमरावती :अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना पराभवाचा सामना करावा लागला. आमदार रवी राणा यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी त्यांनी प्रहारचे नेते,आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोपही केले.बच्चू कडू हे वसुलीबाज असून त्यांना नवनीत राणा यांच्या पराभवासाठी मातोश्रीवरून रसद पुरवण्यात आली, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कडू हे खोक्याच राजकारण नेहमी करत आले.
नवनीत राणा यांनी अमरावतीचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. पण हे काहींच्या पोटात दुखलं. काही नेत्यांनी राजकीय पोळी भाजून घेतली.
अमरावतीत राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंची सभा झाली. नवणीत राणा यांचा पराभव व्हावा, यासाठी अनेक नेते एकत्र आले होते, असेही राणा म्हणाले.
देशात नरेंद्र मोदी यांना थांबवण्यासाठी जे झाले तसेच चित्र नवणीत राणा यांना थांबवण्यासाठी दिसले. महाविकास आघाडीने खोटा प्रचार केला. त्यांच्या या प्रचाराला काही लोक बळी पडले. त्यामुळे अमरावतीच्या विकासाचे नुकसान झाले.अमरावती जिल्ह्याचा एक मोठा चेहरा थांबला.आम्ही निवडणुकीत हरलो असलो तरी देशात जिंकलो आहोत, असेही राणा म्हणाले.