नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून आजारी असलेल्या मेडिकलशी संलग्न ‘बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज’मध्ये शिकणाऱ्या जम्मूकाश्मीर येथील मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नर्सिंग कॉलेजच्या ठिकाणी असलेल्या वसतिगृहात ती विद्यार्थी राहत होती.
या मुलीची प्रकृती बिघडत चालल्याचे समाजात तिच्या मैत्रीणींनी तिला मेडिकलच्या कॅज्युल्टीत नेले. जेआर-१ यांनी बघितले आणि सुटी दिली. वसतिगृहात परतल्यानंतर प्रकृती गंभीर झाली. अखेर बुधवारी (ता.५) वॉर्ड क्रमांक ५२ मध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. यासंदर्भात प्रशासनाकडून तिच्या मामा व आईवडिलांना माहिती देण्यात आली.
‘बी.एस्सी. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर झाल्याचे काळताच प्राचार्यापासून तिच्या प्राध्यापकांनी मेडिकलच्या आयसीयूत धाव घेतली. विशेष असे की, नर्सिंग कॉलजमध्ये वॉर्डन नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुरातील मेडिकलशी संलग्न बीएस्सी नर्सिंगमध्ये देशभरातील मुली शिकायला येत असतात र्सिंग कॉलेजचे प्राचार्य, वॉर्डन हेच या मुलींचे पालक असतात. परंतु वसतिगृहात वॉर्डन नसल्याने विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.