धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर तर्फे ३१ मे २०२५ रोजी “जागतिक तंबाखू विरोधी दिन” साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत कोठे यांच्या मार्गदर्शनात व 20 महा बटालियन एन सी सी युनिटचे कर्नल विकास चंदर शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत एक भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन केले. तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन समाजात जनजागृती निर्माण करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता
रॅलीच्या सुरुवातीला धनवटे नॅशनल कॉलेजच्या कॅडेट्स नी कर्नल विकास चंदर शर्मा यांना गार्ड ऑफ ओनर देऊन स्वागत केल. रॅलीची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातून कर्नल विकास चंदर शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून झाली व ती शहराच्या प्रमुख मार्गांवरून पुढे जाऊन पुन्हा महाविद्यालयात येऊन समाप्त झाली.
या रॅलीमध्ये धनवटे नॅशनल कॉलेज सह डॉ आंबेडकर कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालय, व्ही एम व्ही कॉलेज, एस.बी. सिटी महाविद्यालय मधील कॅडेट्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन “तंबाखूला ना म्हणा”, “नको रे तंबाखू, जीव लावतो धोक्यात”, “आरोग्य हेच धन” अशा घोषणा देत जनतेत तंबाखूविरोधी संदेश पोहोचवला.
यानंतर कर्नल विकास चंदर शर्मा व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजीव गोसावी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “तरुण पिढीने तंबाखूसारख्या व्यसनांपासून दूर राहून आरोग्यपूर्ण जीवन जगणे आवश्यक आहे. तर कॅप्टन डॉ. सुभाष दाढे, यांनी प्रास्ताविकात अशा रॅलीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.”असे सांगितले.
याप्रसंगी लेफ्ट डॉ श्रीकांत शेंडे, 20 महा बटालियन एन सी सी युनिटचे नायब सूबेदार जसविंदर सिंग, हवालदार कुलदीपसिंग, हवालदार धर्मेंद्र,उपस्थित होते.
हा उपक्रम महाविद्यालयातील एनसीसी कैडेट्स यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.