Published On : Thu, Jun 3rd, 2021

मनसर येथे लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांचे कोविड-१९ व म्युकरमायकोसिस या आजाराबाबत जनजागृती

उपजिल्हाधिकारी हेमाताई गढे यांनी केले मार्गदर्शन

रामटेक:- ग्राम पंचायत मनसर येथे कोविड-१९ व म्युकरमायकोसिस या आजाराबद्दल जाणीव जागृती कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला मा.सौ. हेमाताई गढे उपजिल्हाधिकारी मॅडम, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती

Advertisement

होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ योगेश्वरी हेमराज चोखांंद्रे ग्राम पंचायत मनसर तर प्रमुख पाहुणे म्हणून सतीश डोंगरे सदस्य जिल्हा परिषद नागपूर हे होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी कोविड १९ व म्युकरमायकोसिस आजाराबद्दल लक्षणे, उपचार ह्याबद्दल चित्रफीत दाखविण्यात आली व मा. हेमाताई गढे मॅडम उपजिल्हाधिकारी नागपूर यांनी उपस्थितांना यथोचित मौखिक मार्गदर्शन केले.
ह्याप्रसंगी ग्राम पंचायत मनसर चे उपसरपंच चंद्रपाल नगरे, प्रा. हेमराज चोखांद्रे माजी सदस्य ग्राम पंचायत मनसर, ग्राम पंचायत सदस्य-सदस्या, वैद्यकीय अधिकारी,पटवारी, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, शिक्षक, आशा वर्कर, अगंणवाडी सेविका उपस्थित होत्या.

मा. उपजिल्हाधिकारी मॅडम यांनी कोविड विषयक इतंभूत आढावा घेतला व कोविड १९ च्या आजाराने ग्रस्त होऊन मृत्युमुखी पडलेल्या अंगणवाडी सेविका श्रीमती छबिताई वांदिले व आशा सुपरवायझर सौ लक्ष्मीताई गायकवाड यांना उपस्थितांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम विकास अधिकारी श्री भारत वेट्टी यांनी तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती संगीता चंद्रिकापुरे यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement