नागपुर – आम आदमी पार्टी पश्चिम नागपूर, फुटाळा या क्षेत्रात आज ऑक्सिमीटर जागरूकता अभियातर्गत सामान्य व्यक्तीची ऑक्सीजन लेव्हल तपासणी करण्यात करण्यात आली असून नागरिकांशी थेट संपर्क आणि संवाद साधला गेला.
या अभियानात *2* नागरिकांची ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांना ताबडतोब डॉक्टरशी सल्ला मसलत करून योग्य औषधोपचार करावा असे सांगण्यात आले.या अभियानांतर्गत सामान्य नागरिकांचे प्राण वाचविणे हे उद्दिष्ट समोर ठेवून आज *117* नागरिकांची ऑक्सिजन तपासणी करण्यात आली.
कोव्हीड -१९ महामारी संक्रमणाच्या काळात सर्व पार्टी कार्यकर्त्यांनी स्वतः सरकारी आदेशाचे पालन करून मास्क, सॅनिटीझर व सोशल डिस्टनसिंग पाळून त्याचे महत्व नागरिकांना पटवून दिले.
या अभियानात नागपूरचे संघटन मंत्री शंकर इंगोले, संयोजक आकाश कावळे, संघटन मंत्री हरीश गुरबानी, सचिव अल्का पोपटकर, कोषाध्यक्ष हेमंत बनसोड, सहसचिव मीडिया विवेक चापले व संजय सिंग उपस्थित होते.