Published On : Fri, Sep 25th, 2020

नेटकऱ्यांचे वेड ‘डेअर टू डू चॅलेंज’पर्यंत गेल्यास धोकादायक – अजित पारसे – सोशल मीडिया तज्ज्ञ व विश्लेषक

Advertisement

 

‘ब्लू व्हेल गेम’ प्रमाणे स्थितीची शक्यता , नव्या संकटाची चाहूल.

 

couplechallenge च्या अनुषंगाने – संभाव्य धोकादायक चॅलेंज ज्यांनी सार्वजनिक आरोग्य , वैयक्तिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते – killCoronachallenge (कोरोना ला मारा),iamawidowchallenge (मी विधवा आहे ,imsinglenseparatedchallenge (मी एकटा / एकटी आहे), daretodochallenge (हिम्मत असेल तर करून दाखवा), thehardeststuntchallenge (कठीण स्टंट), seemymoney (माझा पैसा बघा), seemedead ( मला संपतांना बघा ) इत्यादी . अशीच विचित्र आणि विकृत स्वरुपाच्या चॅलेंजचे भावनांना डिवचणारे डाव असामाजिक तत्वांद्वारे सोशल मीडिया वर पसरवले जातात .

हळू – हळू आपल्या आत्मविश्वासाचा कल ओळखत असामाजिक तत्वे शुद्ध सायकॉलॉजिकल प्रोफाइल बनवून अश्या खेळी खेळतात .

दुर्भाग्यानी अजाणतेपणी आपण ह्या भावनिक षड्यंत्राला बळी पडतो आणि इच्छेविरुद्ध ” सायकॉलॉजिकल वॉरफेअर ” चे माध्यम बनतो . सोशल मीडिया हा सार्वजनिक संवेदनांच्या , व्यावसायिक गतिविधींचा आदान – प्रदानाचा केंद्रबिंदू आहे , वैयक्तिक भावनांच्या उलाढालीसाठी ह्याचा वापर नक्कीच योग्य नाही . नेटिझन्स नि कोणतेही चॅलेंज स्वीकारतांना किंवा देतांना ह्या बाबींचा पुरेपूर विचार करणे आवश्यक आहे .couplechallenge वर व्यक्त होणाऱ्यानी पुढे ह्याची विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे . सोशल मीडिया हे निव्वळ मनोरंजनाचे माध्यम नसून प्रत्यक्ष समाजच आहे हा विचार करून इथे पण कोणतीही गोष्ट सार्वजनिक करतांना काळजी घेणे .

सध्या ‘फेसबुक’वर नेटकऱ्यांवर ‘कपल चॅलेंज’ने भुरळ घातली आहे. यानंतर आता वेगवेगळे ‘चॅलेंज’ पुढे येत असून नव्या सामाजिक संकटाची चाहूल लागत आहे. नेटकऱ्यांचे वेड ‘डेअर टू डू चॅलेंज’पर्यंत गेल्यास ते ‘ब्लू व्हेल गेम’सारखे धोकादायक ठरण्याची वर्तविण्यात येत आहे.  सोशल मिडियावर विशेषतः ‘फेसबुक’वर सातत्याने वेगवेगळे ‘ट्रेंड’ दिसून येत आहे. केवळ मनोरंजन म्हणून काही ट्रेंड दिसून येते. त्यात आता ‘कपल चॅलेंज’ची भर पडली. त्यानंतर लगेच ‘सिंगल चॅलेंज’, ‘ब्युटीफूल डॉटर चॅलेंज’, ‘ट्रान्सफर मनी टू माय अकाऊंट चॅलेंज’ असेही काही ट्रेंड नेटकऱ्यांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

यात पुढे ‘डेअर टू डू चॅलेंज’सारखा ट्रेंड सुरू झाल्यास मोठी सामाजिक समस्या निर्माण होण्याची शक्यता सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे घरात विलगीकरणात असलेले नेटकऱ्यांच्या मनस्थितीचा लाभ घेत असमाजिक तत्त्वांकडून सोशल मिडियावर हे ट्रेंड सुरू करण्यात आल्यास नवल वाटायला नको. यात उंच बहुमजली इमारतीची संरक्षक भिंत, उंच मनोऱ्यांवर चढून सेल्फी काढणे किंवा जिवाला धोकादायक ठरतील, अशा ‘सेल्फी‘`काढण्याची स्पर्धा लागण्याची शक्यता बळावली आहे. तीन वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेम खेळताना अनेक नेटकऱ्यांनी आत्महत्या केली. ब्लू व्हे गेमचा ‘टास्क’ पूर्ण करताना शहरातही तरुणींनीही आत्महत्या केल्याचे ताजे उदाहरण आहे. ‘डेअर टू डू चॅलेंज’चा ट्रेंड सुरू झाल्यास हिंमत दाखविणे किंवा आव्हान स्वीकारून काहीही करण्याची मानसिकता पुढे आल्यास प्राणाशीच गाठ पडू शकते.

सोशल मिडियातील कुठल्या ट्रेंडला किती प्रतिसाद मिळेल, याचा नेम राहीला नाही. त्यातही चित्तथरारक प्रात्यक्षिकाचे व्हीडीओ तयार करून सोशल मिडियावर अपलोड करण्याचे तरुणाईला नेहमीच वेड राहीले आहे. त्यामुळे ‘डेअर टू डू चॅलेंज’मध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाईच अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजमाध्यमावर काय टाकावे, कशाला प्रतिसाद द्यावा, याबाबत शहाणपण दाखविण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. ‘कपल चॅलेंज’ स्पृहनीय असला तरी त्यानंतर विडो चॅलेंज, डायव्हर्सी चॅलेंजसारखे काही पुढे आल्यास समाजासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या कोरोनाच्या काळात अनेकजण निराश झाले आहेत. त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत समाजात विकृती पसरविण्यासाठी सोशल मिडियावर असामाजिक तत्त्व कार्यरत आहेत. सोशल मिडियावर कुठल्या ट्रेंडला प्रतिसाद द्यायचा, याबाबत प्रत्येकाने शहाणपणा बाळगण्याची आवश्यकता आहे.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ज्ञ व विश्लेषक.