Published On : Sat, May 21st, 2022

निसर्ग पर्यटन करताय वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे वर्णन टाळा वनविभागाचे आवाहन

Advertisement

पांढरकवडा : पांढरकवडा वनविभागा लगत टिपेश्वर अभयारण्य वाघाच्या अस्तित्वामुळे प्रकाशझोतात आहे येथील भौगोलिक परिस्थिती चांगल्या प्रतीचे जंगल तृणभक्षी प्राण्यांची संख्या यामुळे वाघाच्या प्रजननासाठी हा अधिवास पोषक आहे

येथील वाघाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. टिपेश्वर अभयारण्य सफारी करण्याकरिता आलेले पर्यटक निराश होऊन कधीच जात नाही त्यांना वाघाचे दर्शन होते

Advertisement

तेथील गाईड पर्यटकांना टिपेश्वर च्या रोमांचकारी घटना व माहिती सांगतात वाघा सोबतच इतरही वन्य प्राणी जसे चितळ सांबर नीलगाय अस्वल रान डुक्कर मोर गरुड घुबड की किंगफिशर असे अनेक प्राणी पक्षी पाहायला मिळतात आणि ते दृश्य कॅमेरात कैद करण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही खुल्या निसर्गात मनसोक्त विहार करणारे प्राणी पक्षी सर्वांना मोहून टाकतात आणि मग त्यांचे कॅमेरा मध्ये टिपलेले छायाचित्र व गाईडने सांगितलेली माहिती ते सोशल मीडियावर अपलोड करतात प्रसिद्धी देतात वाघाचे अधिकृत नाव जसे की ती वन t2 व त्यांचा आदिवासी यांची माहिती अशाप्रकारे प्रसिद्धी माध्यमात द्वारे प्रसारित करणे वाघाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते त्यामुळे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने या कृत्यास मनाई केलेली आहे

वन्यजीवांचे आदिवास अधिवास माहीत झाल्यामुळे शिकारी त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील व त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकते त्यामुळे पर्यटकांनी सोशल मीडियावर वन्य वन्य जीवाचे अधिकृत नाव व अधिवासाचे ठिकाण प्रकाशित करू नये असे आवाहन किरण जगताप विभागीय वन अधिकारी टिपेश्वर अभयारण्य अतिरिक्त कार्यभार यांनी केले आहे

योगेश पडोळे
प्रतिनिधि पांढरकवडा

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement