Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Feb 5th, 2018

  नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार हरीश कांबळे यांचे निधन

  Harish kamble
  नागपूर : ज्येष्ठ पत्रकार, इनफॉर्मेशन ब्युरो आॅफ इंडियाचे माजी संचालक तसेच आॅल इंडिया रेडिओचे माजी सहसंचालक हरीश शिवराम कांबळे यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

  अन्न व औषधी विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांचे ते वडील तर शासनच्या एमएमआरडी मुंबईचे संचालक प्रवीण दराडे यांचे ते सासरे होते. त्यांच्या मागे पत्नी हेमा कांबळे, मुलगा पंकज, मुलगी, जावई व मोठा आप्त परिवार आहे.

  यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील धानकी हे त्यांचे मूळ गाव होते. दिवंगत कांबळे यांची अंत्ययात्रा ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता त्यांच्या गोविंदनगर प्लॉट नंबर ५ (स्टेट बँक, जयप्रकाशनगर शाखेसमोर) जयप्रकाशनगर खामला येथील निवासस्थानावरून निघेल. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145