Published On : Wed, May 15th, 2019

मोबाईल चोराच्या मुसक्या आवळल्या

रेल्वे स्थानकाहून अटक

नागपूर: प्रवाशांचे मोबाईल चोरणाºया सराईत चोरट्याला आरपीएफच्या पथकाने पकडले. ही कारवाई नागपूर रेल्वे स्थानकावर सोमवारी करण्यात आली. त्याच्या ताब्यातून चोरीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले. किशोर विश्वनाथ पाईकराव (२८, रा. जवळा, आरणी, जि. यवतमाळ ) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.

शनिवारी दुपारच्या सुमारास नागपूर स्थानकाच्या फलाटक्रमांक एक वर हमसफर एक्स्प्रेस येऊन थांबली. या गाडीच्या कोच बी-६ मध्ये चढण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचा मोबाईल चोरट्याने लंपास केला होता. ही घटना सीसीटिव्ही कॅमेºयात कैद झाली होती. यामुळे आरोपीवर पाळत ठेवण्यात आली. सोमवारी दुपारी सीसीटिव्ही नियंत्रण कक्षातील कर्मचारी भुपेंद्र बाथरी, लोकेश राऊत रेल्वेस्थानकावरील हालचालींवर लक्ष ठेवून होते. दुपारी पावणे दोनच्या सुमारास तोच चोरटा नागपूर स्थानक परिसरात पुन्हा दिसला. आरपीएफ जवानांनी लागलीच याबाबत निरीक्षक आर. आर. जेम्स यांना माहिती दिली. त्यांनी आरोपीला पकडण्याचे आदेश देताच भूपेंद्र बाथरी यांनी फलाट क्रमांक एक वर प्रवेशद्वाराजवळी साईडींगजवळून त्याच्य मुसक्या आवळल्या. ठाण्यात हजर केल्यानंतर अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचे तीन मोबाईल आढळले. लगेच त्याने चोरीची कबुली दिली. कायदेशिर प्रक्रियेनंतर पुढील कारवाईसाठी त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.