Published On : Fri, Jul 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई; नागपूरसह 5 जिल्ह्यांत धाड, 10 जण ताब्यात!

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठी आणि गोपनीय कारवाई करत नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी धाडी टाकल्या. प्राथमिक माहितीनुसार, या कारवाईत सुमारे 10 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. ही मोहीम ATS च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या सोशल मीडिया नेटवर्कच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना चिथावणी देणे किंवा कट्टरपंथी विचारांकडे वळविण्याचा प्रयत्न झाला का, याचा तपास ATS करत आहे.

तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स तसेच इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. सोशल मीडियावरील फॉलो, लाईक आणि इतर ऑनलाइन व्यवहारांचाही बारकाईने अभ्यास केला जात आहे.

ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली असून अनेक ठिकाणी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मात्र, ATS कडून अद्याप अधिकृत सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तपास सुरू असल्याने अनेक बाबींवर गोपनीयता राखण्यात आली आहे.

Advertisement

या कारवाईनंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून नागपूरसह विदर्भात या ऑपरेशनची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींविरोधात अद्याप कोणताही गुन्हा अधिकृतपणे नोंद झाल्याची किंवा आरोप सिद्ध झाल्याची पुष्टी झालेली नाही. पुढील माहिती ATS च्या अधिकृत निवेदनानंतरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.