Published On : Fri, Jul 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात स्पाच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका, स्पा चालक अटकेत

Advertisement

नागपूर : नागपूरच्या राणा प्रतापनगर परिसरात स्पा सेंटरच्या आडून कथित देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली. गोपाळनगर येथील ‘मॅजिक क्रिश स्पा अँड सलून’वर टाकलेल्या छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली असून स्पाचा चालक सोमेश मंडले (वय 30) याला अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाला या स्पामध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार दोन पंच आणि बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचण्यात आला. एका महिलेसाठी 3,500 रुपयांचा व्यवहार निश्चित होताच पथकाने स्पावर धाड टाकून कारवाई केली.

चौकशीत समोर आले की, आर्थिक अडचणीमुळे ऑनलाइन नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांना अधिक उत्पन्नाचे आमिष दाखवून या कथित व्यवसायात ओढण्यात आले होते. प्रत्येक ग्राहकामागे त्यांना सुमारे 1,500 रुपये दिले जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दोन्ही महिलांची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

या प्रकरणी राणा प्रतापनगर पोलिसांनी स्पा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावेही जप्त करण्यात आले असून या कथित रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता, याचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.