Published On : Thu, Jan 4th, 2018

संघाच्या केशवद्वार खाली खेळाडूंनी रेशिमबाग मैदानासाठी भीक मागितली खेळाडूनचे रास्तारोको आंदोलन


नागपूर: स्थानिक खेळाडूंना सोबत घेऊन नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात रेशीमबाग येथील संघाच्या केशवद्वार खाली खेळाडूंनी रेशीमबाग मैदानासाठी भीक मांगो आंदोलन केले. तेव्हा पोलिसांशी नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्याशी प्रचंड बाचाबाची झाली असता खेळाडू व संतापले. केशवद्वारा पासून मोर्चा डॉक्टर असोसिएशनच्या कार्यक्रम स्थळी पोहोचला व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले लोकांनी स्वत:हूंन या रास्ता रोको आंदोलनाला समर्थन देऊन रास्ता रोकोत सामील झाले व त्यांनी प्रतिक्रिया दिली की हे मैदान फक्त खेळाडूनसाठी उपलब्ध झाले पाहिजे.

नागपूर सुधार प्रन्यास ला ईशारा दिला होता कि जे अधिकारी व कंत्राटदार मैदानाबाबत केलेल्या भ्रस्टाचारात सामील आहे. त्यांचे वर कार्यवाही करा व खेळाडूना पर्यायी मैदान सरावसाठी उपलब्ध करून दया पण अजुन पर्यंत कुठलीच कार्यवाही केली नाही त्याचीच प्रतिक्रिया म्हणुन हे आंदोलन आहे. खेळाडूचे पालक ही या आंदोलनात सहभागी झाले होते. आज सर्व खेळाडूनी जाहिर केले की पुढील महिन्यात आमची पोलिस भरती आहे. पोलिस भरतीत आमचा नंबर लागला नाही. तर नागपूर सुधार प्रन्यास च्या कार्यालयासमोर आत्मदहन करू जो पर्यन्त हा कार्यक्रम सुरु आहे तो पर्यन्त रोज शहरातील खेळाडूनना सोबत आंदोलन करण्याचा ईशारा बंटी शेळके यांनी दिला.

नागपूर सुधार प्रन्यास,नागपुर महानगर पालिका व पोलिस विभाग गरीबांचे हाथठेले, फेरीवाले, यांची दुकानदारी उचलतात पण या डॉक्टर असोसिएशन च्या कार्यक्रमात आलेल्या हजारो गाड्या अवैधपणे पार्क केल्या आहेत. आता पोलिस वाहतूक विभाग झोपला आहे. पोलिस वाहतूक विभागाने अवैध रित्या पार्क केलेल्या गाडयांना जॅमर लावावे व करवाई करावी. जेणे करून त्या परिसरात वाहतुकीची कोंडी होणार नाही. तसेच या कार्यक्रमाचे होर्डिग व बैनर जागो जागी लागले आहे. ते ही अवैधपणे बिना परवानगीने, विद्युत खाँबावर ट्रैफिक सिग्नलवर लावले आहे. आमची नागपूर महानगर पालीकेचे आयुक्ताकड़े मागणी आहे की जे होर्डिंग व बैनर रेशिमबाग परिसरात लावले आहे.ते काढण्यात यावे व दंडात्मक कारवाई करावी.


आम्ही लोकशाही पद्धतीने अहिंसक आंदोलन करीत आहो. पण प्रशासन जागे झाले नाही तर उग्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा गंभीर ईशारा नगरसेवक बंटी शेळके व खेळाडू व त्यांच्या पालकांनी दिला. याची जबाबदारी सर्वस्वी नागपूर सुधार प्रन्यास, नागपुर महानगर पालिका व पोलिस विभागाची राहिल.

या आंदोलनात अनंता आयती, योगेश परतीके, अंकित खडसे, अक्षय ठाकरे, विक्टोरिया फ्रांसिस, शालिनी सरोदे, राजेंद्र ठाकरे, सागर बैस ठाकुर, अक्षय घाटोले, सौरभ शेळके, स्वप्निल बावनकर, स्वप्निल ढोके, पूजक मदने, प्रकाश निमजे, आशीष लोनारकर, नितिन गुरव, हेमंत कातुरे, मयूर माने, विजेंदर धोपटे, पवन कावनपुरे, अनिकेत पारधी, सोनू सयाम, विशाल बेले, स्वप्निल उमरेडकर, टी दत्तेश इत्यादि खेळाडू व कार्यकर्ते उपस्तिथ होते.