Published On : Tue, Jun 16th, 2020

एनसीपी जिल्हाध्यक्षाच्या मागणी नुसार गृहमंत्री यांना रेती चोरीवर आळा घालण्याचे प्रशासकिय अधिकाऱ्यांना आदेश दिले

Advertisement

नागपुर/मौदा- गृहमंत्री अनिल देशमुख गोंदिया जिल्ह्याचा दौरा असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी मौदा येथे भेट घेऊन जिल्ह्यात रेतीचोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनात आणून रेतीचोरीवर अंकुश लावण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांनी. तात्काळ दखल घेऊन 15 जून ला नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये अवैध रेती वाहतूकने निर्माण होणाऱ्या कायदा व सुरक्षाव्यवस्था या विषयावर गृह व इतर संबंधित विभागांची बैठक घेतली. यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत , चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खानिकर्म महामंडळाचे आमदार आशीष जयस्वाल, विभागीय आयुक्त नागपूर डॉ.संजीव कुमार, नागपूरचे विभागीय आयुक्त रवींद्र ठाकरे, नागपूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नागपूरचे पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपुर योगेश कुंभेजकर उपस्थित होते.

तसेच या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील संबंधित जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे, गोंदियाचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पोलीस नाकाबंदी व नाका येथे महसूल व खनिकर्म विभागाचे कर्मचारी तैनात करून अंकुश लावण्याचे आदेश यावेळी महाराष्ट्र राज्याचे अनिल देशमुख साहेब यांनी दिले.