Published On : Mon, Sep 10th, 2018

रामटेक येथे ठिकठिकाणी पोळा उत्साहात साजरा

Advertisement

रामटेक : रामटेक येथे नेहरू ग्राउंडवर तसेच विविध ठिकाणी मा कांलका मंदिराजवळ,श्री लंबे हनुमान मंदिराजवळ,तहसील कार्यालयाजवळ शिवाजी व आझाद वॉर्ड येथे बैल पोळा उत्साह पूर्ण वातावरनात साजरा करण्यात आला.नेहरू ग्राऊंडवर व बाकी सर्व ठिकाणी रामटेक व परिसरातील खेडेगावातील शेतकरी बांधवानी आपल्या शेतात वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलजोडीस आकर्षक वेशभूषेने सजवून ढोल ताशाच्या गजरात पोळ्यात आणले होते.

यावेळी बैलजोड्यांची पूजा व शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आंब्याच्या तोरणाने सजलेल्या तोरणात बैलजोडी व शेतकरी ओळीने उभे होते.यावेळी शेतकरी बांधवानी झडत्या व महादेवाची गाणी म्हटली.या सर्व बैलजोडयाना पाहण्यासाठी नागरिकानी ,महिलावर्ग ,तरुण ,तरुणी आणि लहान मुलांनि मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी सजवलेल्या बैलजोडीच्या मालकाना शेतकरी बांधवांना पुरस्कारही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी ,नगराध्यक्ष दिलीप देशमुख,नगर परिषद उपाध्यक्ष प्रभाकर खेडकर,लक्ष्मण मेहर , नगरसेवक व रामटेक नगरातील गणामान्य मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.पोळा फुtल्यानंतर शेतकरी बांधवानी घराची वाट धरली .

घरच्या गृहलक्ष्मीने ,सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने पूजा केली व त्यानंतर घरोघरी बैलजोडीची पूजा केली. आजच्या घडीला महागाई ची झळ शेतकरी बांधवाना बसत असतांना तसेच अनेक संकटात शेतकरी सापडला असतांनाही खुपच आनंदी वातावरनात पोळा रामटेक नगरी व परिसरातील भागांत साजरा करण्यात आला.

Advertisement
Advertisement