Published On : Mon, Mar 16th, 2020

राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत कामठी (ग्रा)प्रकल्प पुरस्कृत

कामठी:-जागतिक महिला दिन व राष्ट्रीय पोषण पंधरवाडा उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन 8 मार्च रोजी कै. आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे करण्यात आले होते .या कार्यक्रमात सन 2019-20 वर्षात पोषण अभियानाअंतर्गत उल्लेखनीय काम करणाऱ्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी , पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका याना प्रशस्तीपत्र व समूर्तीचिन्ह देऊन सम्माणीत करण्यात आले यामध्ये जिल्हास्तरावर सन 2019-20या वर्षात पोषण अभियान अंतर्गत पोषण माह सप्टेंबर 2019 दरम्यान केलेल्या उत्तम कामगिरी बाबत कामठी पंचायत समिती च्या बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती मानकर यांना जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताइ बर्वे, महिला बाल कल्याण सभापती उज्वलाताई बोढारे यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र व समूर्ती चिन्ह देऊन सम्माणीत करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल कामठी पंचायत समिती चे सभापती उमेश रडके, उपसभापतो आशिष मललेवार, जिल्हा परिषद सदस्य अवंतीकाताई लेकुरवाडे, अनिल निधान, मोहन माकडे, नाना कंभाले यासह कामठी पंचायत समिती च्या सदस्य तसेच पंचायत समिती च्या समस्त कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

संदीप कांबळे कामठी