Published On : Sat, Oct 3rd, 2020

विधानसभा अध्यक्षांची कोविड हॉस्पिटला भेट

नागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो हॉस्पिटल येथील कोविड हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी सुविधाची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज तेथे भेट देवून घेतली.

रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या व्हिआयपी व साधारण बेड्ची माहिती असलेला डॉशबोर्ड तसेच कॉम्प्युराईज्ड सिस्टिमची माहिती जाणून घेतली. रुग्णांची गैरसोय होणार नाही. गरिब व गरजू कोणीही रुग्ण उपचाराविना वंचित राहू नये याची दक्षता घेऊन रुग्णांना योग्य सेवा मिळाल्या पाहिजेत, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.

Advertisement

मेयो हॉस्पिटल मधील कोविड हॉस्पिटल येथील पी.पी.ई. किट, पल्स ऑक्सीमीटर तसेच सिक्स मिनीट वाकींगबाबत माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णालयातील औषधी विभाग व नवीन बेड्ची पाहणी केली.

Advertisement

यावेळी त्यांनी सुविधांची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सजल मिश्रा व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णास पाहता यावे यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या कॉम्प्युटराईज्ड सुविधेची पाहणी करुन त्याबाबत माहिती विधानसभा अध्यक्षांनी घेतली.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement